Goa Congress

 

Dainik gomantak

गोवा

गोव्यात काँग्रेसला बुरे दिन; 17 पैकी राहिले फक्त 2 आमदार

अपक्ष आमदार रोहन खुंटे यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2017 पासून आतापर्यंत पक्ष बदलणारे ते 21वे आमदार होते

दैनिक गोमन्तक

गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी एक रंजक आकडा समोर आला आहे. तिथे गेल्या निवडणुकीपासून 50 टक्के आमदारांनी पक्ष बदलला आहे. शुक्रवारी अपक्ष आमदार रोहन खुंटे यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2017 पासून आतापर्यंत पक्ष बदलणारे ते 21वे आमदार होते. हा एक मोठा विक्रम आहे.

काँग्रेस सतरा वरून दोनवर

2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 17 उमेदवार जिंकून आले होते, पण 2021 साल संपायला येत असताना त्यांच्या आमदारांची संख्या आता केवळ दोनवर आली आहे. गोव्यात काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था यापूर्वी कधीही झाली नव्हती. सर्वप्रथम विश्‍वजित राणे यांनी काँग्रेसचा त्‍याग केला होता.

गोव्यात (goa) विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 50 टक्‍क्‍यांहून अधिक आमदार असे आहेत की, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) त्यांनी ज्या पक्षाकडून किंवा बाजूने निवडणूक लढवली होती ती आता त्या पक्षाकडे नाहीत, म्हणजे त्यांनी पक्ष बदलला आहे. पक्ष बदलण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत भाजपला सर्वाधिक फायदा झाला आहे. सध्या त्यांची संख्या 27 वर पोहोचली आहे.

काँग्रेसचे (Congress) 10 आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) दोन आमदार त्यांच्या पक्षात सहभागी झाले आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि एक अपक्ष आमदार (MLA) भाजपमध्ये सामील झाले आहेत. 2022 च्या निवडणुकीत भाजप त्यांना तिकीट देईल, अशी आशा पक्ष सोडणारे सर्व आमदारांना आहे.

त्याचवेळी भाजपच्या (BJP) केवळ एक आमदार अलिना सलदान्हा यांनी पक्ष सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. या उलथापालथीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. आता गोव्यात तीनच आमदार उरले आहेत. 2022 च्या निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड (Goa Forwar) पक्षासोबत युतीचा काही फायदा होईल, अशी काँग्रेस पक्षाला अपेक्षा आहे. आता 21 आमदारांनी पक्ष बदलले आहेत, मात्र आता काही महिन्यांनंतर त्याचा फायदा होणार की नुकसान होणार हे कळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT