लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राज्यात ‘आप’ हाच उपाय; प्रसाद शहापूरकर

'लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी केवळ राज्यात आम आदमी पक्षाचेच सरकार आले पाहिजे. ‘आप’ पक्ष म्हणजे सामान्य लोकांचा पक्ष',असे प्रतिपादन प्रसाद शहापूरकर यांनी केले.
AAP

AAP

Dainik Gomantak

Published on
Updated on

Goa Elections: 'गोव्याचे राजकारण शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी केवळ राज्यात आम आदमी पक्षाचेच सरकार आले पाहिजे. ‘आप’ पक्ष म्हणजे सामान्य लोकांचा पक्ष',असे प्रतिपादन मांद्रे मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे नेते प्रसाद शहापूरकर यांनी आस्कावाडा मांद्रे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर केले. यावेळी पक्षाचे नेते उपेंद्र गावकर, उमेश कोलवाळकर, युवा अध्यक्ष पूजन मालवणकर आदी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>AAP</p></div>
.. आता घरी बसून करा ड्रायव्हिंग लायसन्स दुरुस्त

वकील प्रसाद शहापूरकर यांनी पुढे बोलताना मांद्रेच्या समस्या ज्या विरोधी पक्षात आमदार असताना होत्या, त्या तश्याच समस्या आमदार सत्येच्या पक्षात गेले तरी तसे आहेत. नोकरी पर्यटन समस्या मोठ्या प्रमाणात किनारी भागात आहे. मामलेदार, गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी पेडणे (Pernem) सरकारी कार्यालयात कर्मचारी जाग्यावर नाही, लोकांची कामे वेळेत होत नाही, बजबजपुरी वाढलेली आहे, मंत्री आमदार यांचे लक्ष नसल्याने मनमानी वाढलेली आहे. किनारी भागात सीआरझेड समस्या, टॅक्सी व्यावसायीकांच्या समस्या आणि किनारी पर्यटकांसाठी ज्या समस्या आहेत त्या समस्या सरकारला आजपर्यंत सोडवता आल्या नाहीत.

कार्यालयाचा लोकाना उपयोग

आम आदमी पक्षाचे (AAP) मांद्रे मतदार संघात यापूर्वी केरी गावात जनसंपर्क कार्यालय सुरु केले होते. आता मांद्रे येथे जे कार्यालय सुरु केले ते मांद्रे मतदार संघातील प्रत्येक घरा-घरापर्यंत आम आदमी पक्षाचे कार्य पोचवण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या ऐकून सोडवण्यासाठी याचा वापर होणार असल्याचे वकील प्रसाद शहापूरकर यांनी जाहीर केले. पक्षाच्या सर्व योजना लोकापर्यंत पोचवले जाईल, सकाळी साडे नऊ ते साडेपाच पर्यंत हे कार्यालय कार्यरत सुरु राहणार असे शहापूरकर म्हणाले.

<div class="paragraphs"><p>AAP</p></div>
कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांची त्या ग्रामस्थांना भेट..

पुंडलिक धारगळकर यांनी बोलताना लोकाना भरकटण्याचे काम हे राजकीय पक्षाने केलेले आहे, लोकशाहीचा खून या पक्षाने केला आहे, मत व्यक्त केले. आम आदमी पक्ष केवळ स्वाभिमानाने जगवण्यासाठी शिकवतो. लोकाना बदल हवा म्हणून भाजपला आणि कॉंग्रेसला जनता विटलेली आहे. राजकारण त्यांनी केल आणि पोटे भरली, लोकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा त्या वाढवण्यावर भर दिला, असा दावा पुंडलिक धारगळकर यांनी केला.

पक्षाचे सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी बोलताना, ‘प्रसाद शहापूरकर हे राजकारणात नसतानाही पेडणे तालुक्यात जे सामाजिक कायद्याचे कार्य केले त्याला तोड नाही. त्यांनी अनेकाना मदत केली. अनेक योजना लोकापर्यंत ते पोचवण्याचे काम करतात आता राज्याला आम आदमी पक्षाशिवाय पर्याय नाही. मांद्रेतील जनतेने मोठ्या संख्येने प्रसाद शहापूरकर याना पाठींबा द्यावा असे आवाहनही केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com