Goa Assembly 2022: राज्यात सध्या राज्यत राजकीय वातावरण तापले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे; सध्या गोव्याचं राजकारण (Goa Politics) हा चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसात आनेकांनी आपले पक्ष सोडले; काहींनी तर आमदारकी देखील सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी एकमेकांसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला.
BJP आणि MGP यांच्या युतीच्या चर्चाना चांगलंच उधाण आलं होतं, पण दरम्यानच्या कालावधीत "दोनवेळा दगा दिलेल्या भारतीय जनता पक्षाशी (BJP) पुन्हा एकदा युती (Alliance) करणे म्हणजे मगोपने (MGP) आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे, मगोपचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकरांच्या या वक्तव्यामुळे या चर्चाना पूर्णविराम मिळाला होता, परंतु (BJP) जशी कार्यकारिणी बैठकीला सुरवात झाली, पुन्हा या चर्चा रंगू लागल्या दरम्यान भाजप आणि एमजीपीच्या (MGP) युतीची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) युतीसाठी घाईघाईने करार करण्याची इच्छा नसल्याचे संकेत दिले होते. यापूर्वी एमजीपीने 2012 ची निवडणूक (Election) भाजपसोबत युती करून लढवली होती, तर 2017 मध्ये; दिवंगत मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता.
अचानक यू टर्न घेत गेल्या काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी TMC आणि MGP या दोन पक्षानी युतीची घोषणा केली.दरम्यान एमजीपीचे अध्यक्ष पांडुरंग दीपक ढवळीकर यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, दोन्ही पक्षांनी गोव्यातील (Goa) जनतेला सुशासन देण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
आता या युतीचं पुढं नेमकं काय हा प्रश्न आता गोवेकरांना पडला आहे. या युतीचा परिणाम इतर स्थानिक पक्षासाठी मोठ्या अडचणीची ठरणार आहे. शिवाय भाजपसाठी हा मुद्दा आव्हानाचा ठरणारा आहे. टीएमसी आणि एमजीपी यांच्या युतीमुळे भाजप आणि कॉंग्रेस यांच्या कोट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालेे असून, टीएमसी गोव्यात हळूहळू आपला राजकीय रंग दाखविण्यास सुरुवात करत असल्याने येणाऱ्या काळात आप देखील या दोघांसोबत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सामील होतो का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. जर असे झाल्यास येणारी निवडणूक कॉंग्रेस आणि भाजपसाठी नक्कीच कसोटीची ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.