Goa : Press Conferance of Hospital ASG Branch in Donapaula. Dainik Gomantak
गोवा

Goa : एएसजी आय इस्‍पितळाची ३९वी शाखा गोव्‍यात

Goa : दोनापावल येथे उद्‍घाटन : नेत्रविकारांवर अत्‍याधुनिक यंत्रणांद्वारे शस्‍त्रक्रिया सुविधा

Mahesh Tandel

पणजी : विदेशासह भारतात एकूण ३८ शाखा असलेल्या एएसजी आय हॉस्पिटल्स (ASG Hospital) या नामांकित ग्रुपतर्फे गोव्यात ३९ वी शाखा दोनापावला (Donapoula) येथे सुरू करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते आज अद्ययावत नेत्र चिकित्सालय इस्पितळाचे (सुपर स्पेशालिटी आय इस्‍पितळाचे) उद्‍घाटन करण्‍यात झाले. उद्‍घाटन कार्यक्रमादरम्‍यान आयोजित पत्रकार परिषदेत एएसजी आय इस्पितळाचे संचालक डॉ. शॉन डिसिल्वा, डॉ. पियुष जैन, डॉ. अदित्य काजवे व डॉ. चंद्रप्रकाश ओली यांनी इस्पितळ व सुविधांची सविस्तर माहिती दिली.

गोव्यातील या कंपनीचे पहिलेच इस्पितळ असून येथे नेत्र विकाराबाबतच्या सर्व शस्त्रक्रिया अत्‍याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून केल्या जाणार असल्याचे डॉ. डिसिल्वा यांनी सांगितले. ३ पूर्णवेळ तज्‍ज्ञ डॉक्टर या इस्पितळात उपलब्ध असतील. तसेच देशातील तज्‍ज्ञ डॉक्टरांची सेवाही या इस्पितळात उपलब्ध केली जाणार असल्‍याची माहिती डॉ. डिसिल्वा यांनी दिली.
नेत्र चिकित्सेतील सर्व उपचार उपलब्ध असणारे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी इस्पितळ अशी एएसजी इस्पितळाची ख्याती असल्याचे कोर्निया शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉ. ओली यांनी सांगितले. त्‍यांनी ५५ लाख रुग्‍णांवर उपचार केले आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून नेत्र उपचारातील सर्वोत्तम सेवा देण्याचे आमचे ध्येय असल्याचे डॉ. काजवे यांनी सांगितले. युगांडा व काठमांडू येथेही एएसजी आय हॉस्पिटल्सच्या शाखा असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT