Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना झटका; अंतरिम जामीन नाकारला, दिल्लीच्या राेहिणी न्यायालयाचा निर्णय

Goa Nightclub Fire Update: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने नकार दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने नकार दिला. नियमित अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी (ता.११) सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

लुथरा यांच्या अर्जात ते कोणताही क्लब वैयक्तिकरित्या चालवत नसल्याचे म्हटले आहे. फ्रेन्चायझी व्यवस्थापक क्लब चालवतात. गोव्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या क्लबच्या बाबतीत हीच पद्धत होती. फेन्चायझी व्यवस्थापकाला पोलिसांनी याआधीच पकडले आहे. परवानाधारक म्हणून थायलंड येथून गोव्यातील न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी अटकपूर्व जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लुथरा बंधूंच्यावतीने अ‍ॅड. सिद्धार्थ लुथरा व अ‍ॅड. तन्वीर अहमद यांनी उपस्थिती लावली. तर गोवा राज्यातर्फे ज्येष्ठ वकील अभिनव मुखर्जी व अ‍ॅड. सुरजेन्दु शंकर दास यांनी ठोस बाजू मांडली. सुनावणीवेळी गोवा पोलिसांनी न्यायालयात लुथरा बंधू तसेच अग्निकांडविषयी जोरदार हरकती नोंदवत, आपली भूमिका मांडली.

बागकरांच्या वाकुल्याच

या आगीच्या दुर्घटनेनंतर राज्य प्रशासनाने माजी पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालिन सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांना निलंबित केले होते. या दोघांची मंगळवारी दिवसभर, हणजूण पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. विशेष म्हणजे, पोलिसांनी निलंबित तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनाही चौकशीसाठी बोलावले. परंतु, तीन दिवसांपासून ते पोलिसांना वाकुल्या दाखवतआहेत.

एकीकडे शव बाहेर येत होेते; दुसरीकडे मालकाचा पलायनाचा ‘प्लान’

‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री भीषण अग्निकांड घडले. ज्यावेळी अग्निशमन दल तसेच सरकारी यंत्रणा ही भीषण आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. पीडितांचे मृतदेह एकामागोमाग क्लबबाहेर काढत होते.

त्याचवेळी भावनाशून्य बर्च क्लबचे मालक लुथरा बंधूं देश सोडून पळण्याची योजना आखत होते. लुथरा बंधूंनी एमएमटी प्लॅटफॉर्मवरुन दुर्घटनेच्या दीड तासांतच म्हणजे, ७ डिसेंबर रोजी पहाटे १.१७ वाजता थायलंडसाठी विमानप्रवास तिकिट बूक केले. दिल्लीतून संशयित फुकेतसाठी पसार झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: BBL सामन्यात खळबळ! पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमला आग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT