Goa Nightclub Fire: प्रसंगी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवरही होईल कारवाई, क्‍लबमधील आगीनंतर कडक पावले

Goa Nightclub Fire Update: पोलिसांवर जर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी दबाव आणला असेल, तर चौकशीअंती त्‍यांच्‍यावरही कठोर कारवाई करण्‍यात येईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील ‘रोमियो लेन’ क्‍लबच्‍या मालकांनी व्‍यापारी परवान्‍याच्‍या जोरावर इतर परवाने मिळवल्‍याचे मान्‍य करीत, त्‍यांच्‍यावरील कारवाईसाठी पोलिसांवर जर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी दबाव आणला असेल, तर चौकशीअंती त्‍यांच्‍यावरही कठोर कारवाई करण्‍यात येईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

या घटनेची चौकशी सध्‍या जिल्‍हा दंडाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन करण्‍यात आलेली समिती करीत असून, या समितीकडून अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍याचा अभ्‍यास करून न्‍यायालयीन चौकशीबाबत विचार केला जाईल, असेही त्‍यांनी नमूद केले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्‍य सचिव डॉ. व्‍ही. कंदावेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार यावेळी उपस्‍थित होते.

Goa CM Pramod Sawant
Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

या प्रकरणाच्‍या सखोल चौकशीसाठी जिल्‍हा दंडाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली असून या समितीने चौकशीही सुरू केली आहे. या समितीला आठ दिवसांत अहवाल सादर करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. अहवालाचा अभ्‍यास करून या प्रकरणाच्‍या न्‍यायालयीन चौकशीबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत म्‍हणाले.

...तर भाड्याने वाहने देणाऱ्या एजन्‍सींवर कारवाई

राज्‍यात येणारे अनेक पर्यटक रेन्‍ट अ कार, रेन्‍ट अ कॅबचा वापर करीत असतात. त्‍यांच्‍याकडूनही अपघाताच्‍या घटना घडून त्‍यात स्‍थानिकांना जीव गमवावा लागत आहे. त्‍यामुळे यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करून ज्‍या एजन्‍सी पर्यटकांना वाहने देतात त्‍यांचेही परवाने रद्द करण्‍यात येतील, असेही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

गोवा पर्यटकांच्‍या दृष्‍टीने पूर्णपणे सुरक्षित राज्‍य असल्‍याने अधिकाधिक पर्यटकांनी गोव्‍यात यावे, असे आवाहन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

Goa CM Pramod Sawant
Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

तर आस्थापनांचे परवाने निलंबित

नाईट क्‍लब, बार आणि रेस्‍टॉरंटसह पर्यटनाशी संबंधित आस्‍थापनांमध्ये पुढील काळात आगीच्‍या घटना घडू नयेत, यासाठी अशा सर्व आस्थापनांची तपासणी करण्‍यासाठीही समिती स्‍थापन करण्‍यात आलेली आहे. ज्‍या आस्‍थापनांनी आवश्‍‍यक उपकरणे ठेवलेली नाहीत, किंबहुना नियमांचे पालन केलेले नाही, अशा आस्‍थापनांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्‍यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्या अधिकाऱ्याला अटक करणार

रोमियो लेन क्‍लबला लागलेल्‍या आगीप्रकरणी आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्‍यात आले आहे. दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. जो अधिकारी चौकशीसाठी उपस्‍थित राहत नाही, त्‍यालाही पोलिसांकडून अटक करण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले. या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com