Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

Arpora Nightclub Fire: अजय गुप्ताला म्हापसा जेएमएफसी कोर्टाने बुधवारी (२४ डिसेंबर) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटनाप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या लुथरा बंधूंचा सहभागीदार असलेल्या संशयित अजय गुप्ताला म्हापसा जेएमएफसी कोर्टाने बुधवारी (२४ डिसेंबर) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बर्च बाय रोमिओ लेन क्लबसाठी अबकारी (उत्पादन शुल्क) खात्याचा परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राची बनावट ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) वापरल्याप्रकरणी लुथरा बंधूंसह अजय गुप्ता याच्याविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात स्वतंत्र गुन्हा नोंदविला आहे.

परिणामी, म्हापसा पोलिसांनी मंगळवारी कोलवाळ कारागृहातून अजय गुप्ताचा अधिकृत ताबा आपल्याजवळ घेत त्यास रात्री रितसर अटक केली होती. बुधवारी सकाळी अजय गुप्ताला म्हापसा जेएमएफसी कोर्टात उभे केले असता, त्याला न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी या बनावटगिरीबाबत १७ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

साकवाडी-हडफडे येथील सर्व्हे क्रमांक १५९/० मधील घर क्रमांक ५०२/१ मध्ये चालणाऱ्या कंपनीच्या आस्थापनासाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्याच्या उद्देशाने संशयितांनी समान हेतूने जाणूनबुजून कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राची एनओसी तयार केली.

ज्यात संशयितांनी फिर्यादींची नक्कल करून बनावट सही केली व रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर केला. ज्यामुळे फिर्यादी तसेच अबकारी अधिकाऱ्यांची फसवणूक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रोषणाईने उजळले किनाऱ्यांचे गाव! गोव्यात नाताळचा जल्लोष; पाहा पणजीच्या 'इमॅक्युलेट'चर्चचा Video

Bicholim Theft: डिचोलीत पिग्मी कलेक्टरला लुबाडण्याचा प्रयत्न फसला, युवकांनी एकाला पकडले; एक पसार

आगोंद, पाळोळे किनाऱ्यावर बेकायदा कृत्ये, स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; नोंदणी नसलेल्या जलक्रीडा

Rohit Sharma Video: "रोहित भाई..वडा पाव खाओगे क्या?" चाहत्याच्या प्रश्नावर 'हिटमॅन'नं दिलं मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

Goa Municipal Elections: 11 नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी रणधुमाळी! मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकीचा धमाका

SCROLL FOR NEXT