Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Birch Nightclub: बर्च अग्निकांडप्रकरणातील सौरथ लुथ्राला मारहाणीची अफवा! क्लबची बोगस कागदपत्रे कोणी केली? सरकारी पक्ष निष्प्रभ

Goa Nightclub Fire: अटक केलेला क्लबचा सहमालक अजय गुप्ता याने ती कागदपत्रे तयार केली आणि अपलोड केली, हे सरकार न्यायालयात सिद्ध करू शकलेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’साठी अबकारी खात्याचा (उत्पादन शुल्क) परवाना मिळविण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ना-हरकत प्रमाणपत्र कोणी तयार केले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रकरणात अटक केलेला क्लबचा सहमालक अजय गुप्ता याने ती कागदपत्रे तयार केली आणि अपलोड केली, हे सरकार न्यायालयात सिद्ध करू शकलेले नाही.

त्यामुळे गुप्ता याला म्हापशाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज सशर्त जामीन मंजूर केला. अजय गुप्ता याला जामीन मंजूर झाला असला, तरीही तो कोलवाळ कारागृहातून बाहेर सुटू शकणार नाही. कारण, हणजूण पोलिस स्थानकात नोंद असलेल्या बर्च क्लब अग्निकांड प्रकरणात गुप्ता हा संशयितांपैकी एक असल्याने या प्रकरणातही सध्या तो न्यायालयीन कोठडीतच आहे.

...यामुळे जामिनाचा मार्ग झाला मोकळा

जामीन मंजूर करतेवेळी कोर्टाने संशयित गुप्ता याला एक लाख रुपयांची हमी, तसेच पुराव्यांशी छेडछाड करू नये. त्याशिवाय कोर्ट किंवा तपास अधिकारी चौकशीला बोलावतात, तेव्हा संबंधितांसमक्ष हजर व्हावे, अशा अटी घातल्या आहेत. दरम्यान, जे बनावट दस्तऐवज आहेत, ते संशयिताने स्वतः तयार करून अपलोड केले होते, हे सरकारी वकील न्यायालयात पटवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे हा जामीन मिळण्याबाबतचा एक प्रमुख मुद्दा ठरला.

न्यायालयाने नोंदविलेले मुद्दे...

१.अर्जदार गुप्ता हा कथित बनावट ना-हरकत प्रमाणपत्राचा निर्माता नाही. संशयित आरोपीने कथित बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तयार केले हे दाखवणारे फिर्यादीच्या खटल्यात काहीही नाही.

२.अर्जदार अल्पसंख्याक भागधारक (१० टक्के)/निष्क्रिय भागीदार आहे आणि रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर त्याचे कोणतेही नियंत्रण नाही.

३.अर्जदाराने ‘बीईंग जी.एस. हॉस्पिटॅलिटी गोवा एलएलपी’च्या वतीने रेस्टॉरंट चालवण्यासाठी कोणत्याही परवानगी/परवान्यासाठी अर्ज केलेला नाही.

४.सक्रिय सहभाग किंवा गुन्हेगारी हेतूचा पुरावा असल्याशिवाय अर्जदाराला फर्मच्या किंवा इतर भागीदारांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. आरोपीने सक्रिय भूमिका बजावली आणि त्याचा गुन्हेगारी हेतू होता, हे दाखवणारे काहीही नाही.

५.संशयितासंदर्भात तपास पूर्ण झाला आहे आणि अर्जदाराला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. हा खटला कागदोपत्री पुराव्यांवर आधारित असल्याने पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता नाही.

सौरभ लुथराला मारहाणीच्या अफवा पसरल्याने उडाली खळबळ

बर्च अग्निकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सौरथ लुथ्रा याला कोलवाळ कारागृहात सहकैद्यांकडून मारहाण झाल्याची चर्चा सकाळी रंगली होती. अखेर तसा काही प्रकार घडला नसून पाठदुखीच्या तक्रारीवरून त्याला नियमित तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात आणावे लागले, असा खुलासा कारागृह प्रशासनाला करावा लागला. ‘हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मधील अग्निकांड प्रकरणात संशयित लुथरा बंधू हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी सकाळी सौरभ याला कोलवाळ कारागृहात मारहाण झाली, अशी चर्चा सुरू झाली.

मात्र, त्यात तथ्य नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केल्यामुळे या विषयावर पडदा पडला. या प्रकरणातील संशयित सौरभ लुथराला शनिवारी (ता. ७ फेब्रुवारी), सकाळी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. पाठ आणि गुडघेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे सौरभ याने सांगितल्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कोलवाळ कारागृहातून इस्पितळात आणले होते.

मात्र, या विषयाला वेगळेच वळण लागले आणि मारहाणीची चर्चा रंगली. बर्च क्लब अग्निकांड प्रकरणात, सौरभ आणि गौरव हे दोघेही लुथरा बंधू सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या संशयितांना कारागृहात निवळ फरशीवर झोपावे लागत असल्याने सौरभने आपल्याला गुडघे व पाठदुखीचा त्रास जाणवत असल्याची तक्रार केली. त्यानुसार, नियमित वैद्यकीय तपासणीसाठी सौरभला शनिवारी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणले होते. तिथे एक्स-रे काढल्यानंतर सौरभला पुन्हा कारागृहात नेण्यात आले, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT