Goa Arrest News Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Cases: बार्देशात गुन्हा शाखेचा कडक छापा; लाखभर रुपयांच्या गांजासह बंगळूरमधला युवक जेरबंद

Bardez Drug Case: पथकाने टाकलेल्या छाप्यात बंगळूर येथील रहिवासी २८ वर्षीय मोहम्मद रेहान याला अटक करण्यात आली आहे

Akshata Chhatre

गिरी: गोव्यातील गुन्हा शाखेने केलेल्या एका महत्वाच्या कारवाईत त्यांनी ड्रग बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतलं आहे. बार्देस तालुक्यातील गिरी येथे मोंटे येथील मैदानाजवळ पथकाने टाकलेल्या छाप्यात बंगळूर येथील रहिवासी २८ वर्षीय मोहम्मद रेहान याला अटक करण्यात आली आहे.

गुन्हा शाखेने केलेल्या कारवाईत त्यांच्या हाती एकूण १.०२ किलोग्रॅम गांजा लागला असून त्याची किंमत १,००,००० रुपये रोख रक्कम आहे. अधिकाऱ्यांनी आरोपीकडून ड्रग्स आणि इतर संबंधित वस्तू देखील जप्त केल्या आहेत.

पीआय किशोर रमणन, एलपीएसआय प्रगती मळीक, एएसआय श्रीराम साळगांवकर आणि कॉन्स्टेबल संदेश कांबळी, स्वप्नील सिमेपुरुषकर आणि कृतेश किनळकर यांच्यासह पंचांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. सध्या अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि गुन्हा शाखेचे एसपी राहुल गुप्ता आणि उप एसपी राजेश कुमार आयपीएसांच्या देखरेखीखाली पुढील तपास करत आहेत.

गोव्यात गांजाचा विळखा घट्ट होतोय

सासष्टी तालुक्यासह राज्यात गांजा विक्रीची प्रकरणे वाढत आहेत. पोलिस कारवाई करतात. मात्र, त्याचे प्रमाण नगण्य आहे. सासष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी गांजा सहज उपलब्ध होत असल्याचे लोक सांगतात. तरीही पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत.

मडगाव पोलिसांनी मूळ तामिळनाडू राज्यातील अरुण प्रसाथ गणेशन याला पकडून त्याच्याकडील १ लाख ९ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. हा संशयित गोव्यात किनारपट्टीवर फोटोग्राफर म्हणून काम करीत असल्याचा बनाव करीत होता. प्रत्यक्षात तो गांजा विकत असे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यापूर्वी मडगाव पोलिसांनी ओम प्रकाश या उत्तर प्रदेशातील युवकाला अटक करून ३० हजार ४०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT