
Increased Drug Cases In Goa
मडगाव/वास्को: सासष्टी तालुक्यासह राज्यात गांजा विक्रीची प्रकरणे वाढत आहेत. पोलिस कारवाई करतात. मात्र, त्याचे प्रमाण नगण्य आहे. सासष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी गांजा सहज उपलब्ध होत असल्याचे लोक सांगतात. तरीही पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत.
मडगाव पोलिसांनी मूळ तामिळनाडू राज्यातील अरुण प्रसाथ गणेशन याला पकडून त्याच्याकडील १ लाख ९ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. हा संशयित गोव्यात किनारपट्टीवर फोटोग्राफर म्हणून काम करीत असल्याचा बनाव करीत होता. प्रत्यक्षात तो गांजा विकत असे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यापूर्वी मडगाव पोलिसांनी ओम प्रकाश या उत्तर प्रदेशातील युवकाला अटक करून ३० हजार ४०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता.
तो रोजगाराच्या शोधात गोव्यात आला होता. येथे त्याचे काही मित्र काम करीत होते, असे पोलिस चौकशीत उघड झाले. कोलवा पोलिसांनी सोनू कुमार चौहान या २४ वर्षीय युवकाला अटक करून २ लाखांचा गांजा जप्त केला होता. मडगावात रेल्वे तसेच बस मार्गे गांजा येतो. चिंतेची बाब म्हणजे, शाळकरी विद्यार्थीही या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हरमल येथे अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून चरस जप्त केले. याप्रकरणी जपान आणि जर्मनीमधील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी वाडे येथील खजाप्पा गायकवाड (वय २४ वर्षे) याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला. चिखलीच्या जॉगर्स पार्कजवळ एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे १.०२ किलोग्रॅम गांजा मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.