Late Night Party on Goa Beach Dainik Gomantak
गोवा

बंद म्हणजे बंद ! हणजूण, वागातोरमधील नाईट पार्ट्यांप्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; रात्री 10 नंतर सुरु असलेल्या..

Anjuna Police: नाईट पार्ट्यांवर कारवाईचे आश्वासन; ग्रामस्थांचा आग्रह लक्षात घेऊन कठोर पावले

Ganeshprasad Gogate

Anjuna Police: उच्च न्यायालयाने आदेश देऊनही हणजुण व तसेच वागातोर सारख्या किनारपट्टीवरील बहुतांश भागांमध्ये रात्री 10 नंतर नाईट पार्ट्यांच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण आणि अनैतिक प्रकार सुरु असून काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी या प्रकाराला आळा बसावा यासाठी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांची भेट घेतली होती.

लोबो यांनी या बैठकीत संबंधित रेस्टोरंट मालक, हॉटेल व्यावसायिक यांना बोलावून संबंधितांच्या तक्रारी सांगितल्या होत्या. हे सर्व प्रकार न थांबल्यास या प्रकरणी पोलीस प्रशासनाचा आधार घेऊन कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता.

मात्र एवढे होऊनही हणजूण, वागातोर मधली परिस्थिती बदलली नसून आज सोमवारी पुन्हा आमदार लोबो यांच्यासहित हणजूण, वागातोर ग्रामस्थांनी हणजूण पोलीस PI प्रशाला देसाई यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीस प्रशासनाने देखील याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देत पोलीस रात्री 10 नंतर समुद्र किनारी गस्त घालतील असे सांगितले आहे.

वेळेचे पालन न करणे, मोठ्या आवाजातील संगीत लावून ध्वनी प्रदूषण करणे यासारख्या गोष्टींवर हणजूण पोलीस स्टेशन कारवाई करणार आहे. 10 नंतर म्युझिक सुरु असलेल्या क्लब, रेस्तोरंटच्या म्युझिक सिस्टीम जप्त करून केसेस दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या मोहिमेची सुरुवात आज सोमवारपासून होणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले असून यामुळे किनारीभागातील परिस्थिती कितपत बदलेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

SCROLL FOR NEXT