पत्रादेवी ते पर्वरी राष्ट्रीय महामार्ग 66 च्या विस्तारीकरणाच्या कामात अनेकांचा जीव गेला आहे. सातत्याने भूस्खलन तसेच रस्ते खचण्याचे प्रकार यामुळे भाजप कुटुंबाचा सदस्य असलेल्या कंत्राटदाराची निकृष्ट कामे उघडकीस आली आहेत. उत्तरेचे खासदार श्रीपाद नाईक यांचे मौन चिंताजनक आहे. हा मुद्दा संसदेत मांडण्याचा माझा प्रयत्न असेल, असे विरियातो म्हणाले.
अहमद देवडी खूनप्रकरणी आरोपी रामकृष्ण उत्तम भालेकर उर्फ आरके (32) याला 10 दिवसांची पोलीस कोठडी. खूनप्रकरणातील दुसरा आरोपी बाबू अद्याप फरार असून म्हापसा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू.
11 केव्ही औद्योगिक आयएफबी फिडरवर दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (23 जून) सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेर्णा, नागोवा, कुठ्ठाळी, केळशी आणि वेर्णा आयडीसी भागात वीजपुरवठा राहणार बंद.
कोलवाळ पोलिसांच्या वतीने लाला की बस्तीमध्ये भाडेकरु तपासणी मोहीम राबवली असता, दहा जणांकडे कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.
पेडणे येथे संरक्षक भिंत कोसळ्याने मोठी दुर्घटना होता होता टळली. याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी केली आहे. तसेच, अशा अकार्यक्षक कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून नुकसान भरपाई घेण्याची मागणी त्यांनी केलीय.
पुढील चोवीस तास गोव्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याकाळात दोन्ही जिल्ह्यात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मालपे पेडणे राष्ट्रीय महामार्ग 66 वरील रस्त्याच्या बाजूला बांधलेली संरक्षण भित कोसळली. एक वाहन सुदैवाने वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही भिंत कोसळणार असे वृत्त ही प्रसारित झाले होते. यात एक संपूर्ण कुटुंब वाचले. ही घटना 10.30 वाजता घडली.
डिचोलीत दोन दुकानांना आग. भुमिका स्टोर्स हे भुसारी दुकान जळून खाक. जोडून असलेले शिलाई दुकानही जळाले. शनिवारी (22, जून) पहाटेची घटना. 8 लाखांहून अधिक रुपयांची हानी. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज.
चिंचणी येथे आज (22, जून) पहाटे इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दुचाकी महिला चालकाचा मृत्यू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.