RTO Check Point at Molem  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब; लॉरी असोसिएशनकडून कारवाईची मागणी, मुख्यमंत्री, अधिकाऱ्यांना निवेदन

Goa Roads: ओव्हरलोड माल वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असून अशी वाहतूक करणारी वाहने तसेच कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन ऑल गोवा लॉरी असोसिएशन व कर्नाटकातील लॉरी असोसिएशनने अधिकाऱ्यांना सादर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Road Damage Due To Overloaded Vehicles in Goa

कुळे: ओव्हरलोड माल वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असून अशी वाहतूक करणारी वाहने तसेच कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन ऑल गोवा लॉरी असोसिएशन व कर्नाटकातील लॉरी असोसिएशनने मोले येथील आरटीओ तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना सादर केले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, ओव्हरलोडींगमुळे केवळ रस्त्यांचे गंभीर नुकसान होत नाही तर स्थानिक रहिवासी तसेच अन्य रस्ता वाहतुकीलाही धोका निर्माण होतो. सतत ओव्हरलोडींगमुळे रस्त्यांची स्थिती बिघडली आहे, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

ओव्हरलोडिंगला आळा घालण्यासाठी कायद्यात विविध तरतुदी आहेत, परंतु त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष चालवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओव्हरलोड माल वाहतुकीवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मात्र या विरोधात कारवाई होत नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे, असा दावा या निवेदनात केला आहे.

यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस - डॉ. जी. आर. के. एस. मणी, कोप्पल युनियन- हनुमंतप्पा, हुबळी युनियन - गिरीश मलानाडू, बेळगाव युनियन- नामदेव चव्हाण, विजय, चिक्कोडी, खानापूर युनियन- विजय साळुंखे, मुनिस्वामी नायडू, फोंडा गुड्स असोसिएशन नागराज नायडू व गणेश शर्मा उपस्थित होते.

आरटीओ आणि पोलिसांची डोळेझाक

कायद्याच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी, आरटीओ आणि पोलिस अधिकारी या गैरप्रकारांकडे डोळेझाक करतात. ओव्हरलोड ट्रकला रस्त्यावर परवानगी देऊन ते इतर रस्ता वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करीत असतात असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.

कारखान्यांवर कारवाई करा

या प्रकाराला सर्व औद्योगिक युनिट्सच्या व्यवस्थापनास जबाबदार धरले जावे. त्यांच्याकडून दंड आकारला जावा. तसेच अवमानाची कारवाई केली जावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

रस्त्यांचे गंभीर नुकसान; च्यारी

राज्यातील औद्यागिक कारखान्यांतून ओव्हरलोड माल वाहतूक केली जाते. त्यामुळे राज्यातील तसेच इतर राज्यातील रस्तेही खराब होत आहेत, याकडे ऑल गोवा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत च्यारी यांनी लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT