Malim Jetty Murder Case: मालिम जेटी खून प्रकरण! मुख्य संशयित अजूनही फरार; दोनजणांना अटक

Mandovi Bridge Murder Case: मालिम जेटीवर काही कर्मचाऱ्यांची पर्वरी पोलिसांनी चौकशी केली होती. रात्रीच दोघांना अटक केली. मुख्य संशयित फरारी असल्याने त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
Arrest, Jail, Crime
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

Malim Jetty Mandovi Bridge Murder Case

पणजी: मालिम जेटी येथे मांडवी पुलाखाली असलेल्या मासळी कापण्याच्या ठिकाणी एका युवकाचा दगडाने डोके ठेचून खून केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी दोघांना अटक केली तर तिसरा संशयित फरारी आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मद्याच्या नशेत झालेल्या भांडणातून ही घटना घडली. खून झालेल्या युवकाची ओळख अजून पटलेली नाही. मयत व अटक केलेले संशयित हे ट्रॉलर्सवर काम करणारे असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत युवक व इतर तिघे मांडवी पुलाखाली मासळी कापण्याच्या ठिकाणी शेडमध्ये शुक्रवारी (८ नोव्हेंबर) रात्री उशिरापर्यंत मद्यपान करत बसले होते. काही क्षुल्लक कारणावरून मयत युवकाने इतर तिघांशी हुज्जत घातली. यावेळी त्यांच्यात मारामारी झाली. रागात या तिघांमधील एकाने तेथील दगड त्या युवकाच्या डोक्यात घातला.

त्यामुळे युवक जागीच ठार झाला. नंतर तिघे तो मृतदेह तेथील झाडीत टाकून पसार झाले. शनिवारी संध्या. ४.३०च्या सुमारास इंटननेट कनेक्शन देणारे कर्मचारी तेथे काम करताना त्यांना झाडीत एक युवक पडलेला दिसला. मात्र, त्याची हालचाल होत नव्हती. त्यांनी ही माहिती तेथील लोकांना दिल्यावर पोलिसांना कळवले. मृतदेह गोमेकॉ’ शवागारात पाठवला.

Arrest, Jail, Crime
Cash For Job: लाखोंच्या देणग्या, महाप्रसाद, दागिने अर्पण; लोकांकडून उकळलेल्या रुपयांतून 'दीपश्री'चे कारनामे

मुख्य संशयिताच्या शोधात पोलिस

प्रथमदर्शनी युवकाच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा चेहरा ओळखण्यापलिकडे होता. संशयित हे मालिम जेटीवरच काम करणारे असण्याची शक्यता पर्वरी पोलिसांनी शंका व्यक्त करून तपासकाम सुरू केला होता. काल रात्रीच मालिम जेटीवर काही कर्मचाऱ्यांची पर्वरी पोलिसांनी चौकशी केली होती. रात्रीच दोघांना अटक केली. मुख्य संशयित फरारी असल्याने त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com