Garbage Collection  Dainik Gomantak
गोवा

कचरा गोळा करण्यासाठी चक्क डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग; आमोणे पंचायतीचा नवा फंडा, 'अशा' पद्धतीने सुरु आहे काम

घरोघरी कचरा गोळा करण्यास सुरवात

गोमन्तक डिजिटल टीम

Garbage Collection In Goa प्रत्येक घरात क्युआर कोड स्कॅनर बसवून ठरल्या दिवशीच घरातील कचरा गोळा करण्याच्या मोहिमेला आमोणे पंचायतीने सुरवात केली आहे. आमोणे पंचायत क्षेत्रात आठशेवर घरे आहेत. प्रत्येक घरातील सुका कचरा गोळा करून वेदांता कंपनीसमोरील जागेत साठवला जातो.

कचरा गोळा करण्याच्या कामात सुरळीतपणा यावा तसेच ठरल्या दिवशीच कचरा उचलला जावा यासाठी क्युअार कोड स्कॅनरची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या घरातील कचरा कधी उचलला आणि कोणत्या घरांतील कचरा उचलणे बाकी आहे हे पंचायतीला समजणे सोपे जाणार आहे.

येथील कचरा समस्येची गंभीर दखल घेत या भागाचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंचायत मंडळाबरोबर अनेक बैठका घेतल्या. तसेच मिनरल फाउंडेशन व वेदांता कंपनीचे सहकार्याने क्युआर कोड स्कॅनर योजना राबवण्यास पाठबळ दिले.

क्युआर कोड स्कॅनर बसवण्यात आल्यानंतर आंबेशी येथील गंधा गुरुदास गावस यांच्या घराकडून कचरा गोळा करण्याच्या मोहिमेस प्रारंभ झाला.

यावेळी सरपंच कृष्णा गावस, उपसरपंच दिया सावंत, पंच गौरवी गावस, वसंत सिनारी, सागर फडते, अनिशा आमोणकर, वासुदेव घाडी यांची उपस्थिती होती. सरपंच कृष्णा गावस यांनी मुख्यमंत्री व पंचांच्या सहकार्यातून ही मोहिम सुरू झाल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT