अचारसंहिता लागण्यापूर्वीच ही रिक्त पदे भरण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली. Dainik Gomantak
गोवा

Goa: अचारसंहितेपूर्वीच सर्व सरकारी रिक्त पदे भरणार

निवडणुकीची आचार संहिता लागण्याआधीच या पदांची भरती करण्यात येईल. तसेच गोव्यातील (Goa) सर्व प्रलंबीत प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारी नोकरीतील (Government job) 8 हजार पदांसाठी जाहिराती प्रसिध्द झाल्या असून, दोन हजार पदांसाठी येणाऱ्या आठ ते दहा दिवसांत जाहिरात प्रसिध्द होणार आहे. विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) अचारसंहिता लागण्यापूर्वीच ही रिक्त पदे भरण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली.

प्रलंबित प्रकल्प, योजना आणि सरकारी नोकरभरती याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आतापर्यंत आठ हजार पदांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन हजार पदे भरण्यासाठी येणाऱ्या आठ ते दहा दिवसांत जाहिराती देऊन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. निवडणुकीची आचार संहिता लागण्याआधीच या पदांची भरती करण्यात येईल. तसेच गोव्यातील सर्व प्रलंबीत प्रकल्पांची यादी काढण्यात आली असून, या सर्व प्रकल्पांना गती मिळावी यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा या मोहिमेअंतर्गत आखलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा. अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त गोव्याला 300 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 150 कोटी हे आपल्याला मिळाले आहेत. याच निधीतून पंचायतींना तेथील अनेक प्रकल्पांसाठी 50 लाख रुपये आणि पालिकांना 1 कोटींचा निधी येणाऱ्या 19 डिसेंबरपूर्वीच वितरीत करण्यात येईल. असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT