Ali Khanzade Murder Case Goa Dainik Gomantak
गोवा

अली खानजादे खून प्रकरण, अल्ताफला आणले गोव्यात; छातीत वेदनांची तक्रार, इस्पितळात दाखल

Ali Khanzade Murder Case Goa: घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे यांच्या खून प्रकरणी बंगळुरू विमानतळावर जेरबंद केलेल्या अल्ताफ शाह सय्यद याला बुधवारी गोव्यात आणण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे यांच्या खून प्रकरणी बंगळुरू विमानतळावर जेरबंद केलेल्या अल्ताफ शाह सय्यद याला बुधवारी गोव्यात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याने छातीत कळा येत असल्याची तक्रार केल्याने त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी कोठडी मागणीसह न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती फातोर्डा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली.

अल्ताफ हा खून घडण्याच्या दोन दिवसांपूर्वी दुबईला पळून गेला होता. तेथून परत आल्यानंतर त्याला बंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील तो नववा संशयित आहे. ३० जानेवारी रोजी शुक्रवारी नमाजानंतर अली कलंदर खानजादे यांचा पोटात चाकू खुपसून खून करण्यात आला होता. मशिदीच्या समितीवरील वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अक्रम खानसह आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकंदर, सक्रुद्दिन शेख, हुसेन खान, निजामुद्दीन सय्यद आणि साहिल कन्वी उर्फ स्पाकी या आठ जणांना अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (२), ६१, ३५१ व १९० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच प्रकरणात सर्फराज मकंदर व मेहबूब मकंदर या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

दरम्यान, अक्रम खान हा या प्रकरणातील प्रमुख संशयित असून तो व साहिल कन्वी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इतर काही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT