Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: 2030 पर्यंत गोवा वीजनिर्मितीत आत्मनिर्भर! वीजमंत्र्यांनी सांगितला प्लान

Minister Sudin Dhavalikar: गोव्यात विजेच्या समस्या राहू नयेत यासाठी कार्यवाही सुरू आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. फोंडा तालुक्यात ४५० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत, सबंध राज्यात ५५०० कोटी रुपये खर्चण्यात येत आहेत, असे ढवळीकर म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Minister Sudin Dhavalikar At Kundaim Underground Power Line Connection Programs

फोंडा: गोव्यात विजेच्याबाबतीत स्वयंपूर्णता आणण्यासाठी सुरू असून २०३० पर्यंत १५० मेगा वॅट वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याची ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. कुंडई येथील भूमिगत वीजवाहिन्या जोडणी कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

हा कार्यक्रम मानसवाडा - कुंडई (Kundaim) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृहात झाला. यावेळी सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत न्यू इंग्लिश हायस्कूलचे व्यवस्थापक संतोष महानंदू नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, स्थानिक सरपंच सर्वेश गावडे, मडकई सरपंच शैलेंद्र पणजीकर, दुर्भाट सरपंच चंदन नाईक, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळ्येकर, वीज खात्याचे इतर अधिकारी, मुख्याध्यापिका श्‍वेता हळदणकर व उज्वला नाईक उपस्थित होत्या.

सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, की भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याला वीज दिली. आता ही वीज जोडणी सुविहित करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून राज्यात ५५०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. विकासाची कामे करताना नागरिकांचे सहकार्य हे मोलाचे ठरते. विजेची मोठी कामे करण्यासाठी केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य लाभले आहे.

संतोष महानंदू नाईक म्हणाले, की सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सुदिन ढवळीकर यांची पद्धत असून त्यांच्या कामामुळे सर्वसामान्यांना जास्त फायदा झाला आहे. नवीन उपक्रम आखताना त्याचा लाभ सर्वसामान्यांना कसा होईल याकडे ढवळीकर यांचा कटाक्ष असल्याने एक उत्तम राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

यावेळी सुदन कुंकळ्येकर, गणपत नाईक, शैलेंद्र पणजीकर, श्‍वेता हळदणकर व इतरांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी विद्यालय, शाळा तसेच गणेशोत्सव मंडळाला भूमिगत वीज जोडण्या देण्यात आल्या.

वीज समस्या सोडविणार

राज्यात विकासाची कामे सुरू आहेत. केवळ मडकई आणि फोंडा तालुकाच नव्हे, तर सबंध गोव्यात विजेच्या समस्या राहू नयेत यासाठी कार्यवाही सुरू आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. फोंडा तालुक्यात ४५० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत, सबंध राज्यात ५५०० कोटी रुपये खर्चण्यात येत आहेत, असे ढवळीकर म्हणाले.

मोफत सौर ऊर्जा पॅनल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब घटकांना मोफत सौर ऊर्जा देण्याचा संकल्प केला असून गोव्यातही ही योजना चालीस लावण्यात आली आहे. निर्धारित वीज बिलाच्या ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळणार असून त्यासाठी मोफत सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. या सौर ऊर्जेमुळे ग्राहकाला शून्य बिल येणार असून इच्छुकांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT