Goa Agriculture | Marigold Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: गोव्यातील झेंडू उत्पादकांना पाऊसाचा फटका!

Goa Agriculture: पाऊस अधिक झाल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम या फुलशेतीवर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: आत्मा योजनेअंतर्गत सत्तरी तालुक्यामध्ये झाली आहे. पाऊस अधिक झाल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम या फुलशेतीवर झाला आहे. सुमारे 80 टक्के लागवड नष्ट झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवाळीच्या सणांमध्ये सत्तरी तालुक्यातील झेंडूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

काही शेतकऱ्यांच्या मते शेती खात्याच्या आत्मा योजनेंतर्गत वितरित केलेली झेंडू फुलांची रोपटी ही रोगग्रस्त होती. यामुळे या लागवडीवर त्याचे दुष्परिणाम होऊन ही लागवड नष्ट होण्याची भीती आहे. झेंडू फूलच बाजारात येणार नाही म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. त्याचबरोबर पावसाची संततधार सुरु असल्याने त्याचा इतर पिकावरही परिणाम होण्याची शक्यत आहे.

कृषी खात्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या आत्मा योजनेंतर्गत सत्तरी तालुक्यात झेंडू फुलांची 10 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. गेल्या वर्षी सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र वातावरणामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, झेंडू फुलांची लागवड केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी पावसामुळे ती रोपटी सुकू लागली.

औषधांची फवारणी करण्यात आली तरी त्यात सुधारणा झाली नाही. अनेक उत्पादकांची जवळपास 80 टक्के झाडे नष्ट झाली आहेत. बाजारात फुलेच जाणार नसतील तर तोटाच सहन करावा लागणार आहे. काही शेतकऱ्यांना दिलेली रोपटी अगोदरच रोगग्रस्त असल्याने ती या वातावरणात टिकाव धरू शकली नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या वर्षी जवळपास 7 हेक्टर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड झाली होती. यंदा क्षेत्रामध्ये वाढ होऊऩ ते 10 हेक्टरवर पोहोचले होते. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांचे उत्पादन होण्याची शक्यता दिसत होती.

दिवाळीच्या सणाच्यावेळी इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात राज्यातील बाजारपेठांमध्ये झेंडू फुले उपलब्ध होतात. यंदा मात्र स्थानिक शेतकऱ्यांकडून झेंडू फुले बाजारात आली नाहीत, तर त्यांना इतर राज्यातील फुलांवर अवलंबून रहावे लागणार आहे. शिवाय विक्रेते सांगतील त्या दराने ग्राहकांना फुले खरेदी करावी लागणार आहेत.

फुले महागण्याची शक्यता

सत्तरी तालुक्यातील यंदा अपेक्षित प्रमाणात झेंडूचे उत्पादन होणे कठीण आहे. यंदा दसऱ्याच्यावेळी बाजारात दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो दरानी झेंडू फुले विकली होती. त्यामुळे आता उत्पादन कमी झाल्यामुळे बाहेरून येणारी फुलांचे दर वाढण्याची भीती आहे.

कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी सांगितले, यंदा पावसाचे प्रमाण अति झाल्यामुळे त्याचा झेंडू लागवडीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना चांगली उत्पादन मिळाले होते. मात्र, यंदा पावसाची संततधार चालू असल्याने त्याचा झेंडू फुलांच्या वाढीवर परिणाम झाला व ही लागवड मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे.

योगेश देसाई, शेतकरी गुळेली-

गेल्या वर्षी झेंडू फुलाची चांगली लागवड झाली होती. त्यामुळे यंदा लागवड करताना असे वाटत होते की यावेळी चांगले उत्पादन मिळेल. यंदा हवामानामुळे रोग पडल्याने ६० टक्के फुलझाडे मेली, तर उर्वरीत झाडे पाऊसामुळे खराब झाली. गेल्या वर्षी दसऱ्याच्या वेळी शंभर किलो फुले बाजारात विकली होती.

यंदा जवळपास 20 ते 30 किलो फलांचे उत्पादन मिळाले आहे. दिवाळीपर्यंत आणखी काही उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाची संततधार सुरू असल्याने फुले कुजू लागली आहेत. दिवाळीपर्यंत ती राहतात की नाही, याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

दाट धुक्यामुळे अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन दरीच्या टोकावर थांबला; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

Goa Assembly Live: मुद्रण आणि स्टेशनरी विभागांतर्गत 5 डिजिटल उपक्रम सुरू

Amazon-Flipkart Sale: स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत... ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही; ॲमेझॉन-फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'चं बिगुल वाजलं!

Surya Grahan Astrology: 2 ऑगस्टला सूर्य ग्रहण पाळावं का? हिंदू पंचांगात दिलेली माहिती वाचा; ग्रहणाचे नियम व अटी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT