Goa News: कचरा समस्येवर; कायमस्वरुपी तोडगा काढा!

Goa News: कवळे पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कचऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला.
Goa News | Garbage
Goa News | GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: कवळे पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कचऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पंचायतीने कचरा समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी आग्रही एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.

स्थानिक आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढील ग्रामसभेला उपस्थित राहून कचरा समस्येवर तोडगा काढताना मार्गदर्शन करावे असेही उपस्थितांनी सूचना केली. दरम्यान, भगवती मंदिरासमोरील गाडे हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन गटात खडाजंगी झाली.

Goa News | Garbage
PM Kisan Scheme: 'पंतप्रधान किसान समृध्दी'चा साखळीत दिमाखात शुभारंभ

सरपंच मनुजा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या सभेस इतर पंचसदस्य उपस्थित होते. पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला. यावेळी पंचायतीसमोर उभारलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला. तो प्रकल्प कायदेशीर आहे की नाही, याबाबत पंचायतीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ग्रामस्थांनी केवळ कवळे पंचायतीचाच नव्हे तर संपूर्ण मडकई मतदारसंघाचा कचरा प्रक्रिया प्रकल्प निर्जनस्थळी उभारावा, अशी मागणी केली. या प्रकल्पासाठी कोमुनिदाद किंवा देवस्थान समितीच्या अखत्यारितील जमीन संपादित करावी, अशीही सूचना याप्रसंगी मांडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com