Agriculture Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Agriculture Minister Ravi Naik: फॉर्टीफाईड तांदूळाबाबत गैरसमज नको; तो खाण्यास योग्यच

Agriculture Minister Ravi Naik: सरपंच, पंच, सचिवांना मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture Minister Ravi Naik राज्यात नागरी पुरवठा खात्यातर्फे दिले जाणारे फॉर्टीफाईड तांदूळ हे खाण्यास योग्‍य आहे. ते तांदूळ जीवनसत्त्वयुक्त असल्याने त्याच्याविषयी गैरसमज नको आहेत.

केंद्र सरकारकडून खास त्याचा पुरवठा होत आहे, असे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी नुकत्याच झालेल्या वेबीनारवर सहभागी सरपंच, पंचसदस्य, सचिव यांना सांगितले.

राज्य सरकारातील नागरी पुरवठा खाते, कृषी आणि हस्तकला या खात्यातील अधिकाऱ्यांमार्फत योजनांची माहिती वेबीनारच्या माध्यमातून करण्यात आले.

त्यावेळी सुरुवातीला नागरी पुरवठा खात्याविषयी माहिती देताना मंत्री रवी नाईक म्हणाले, फोर्टीफाइड राईस हा तांदूळ जीवनसत्त्वयुक्त बनविला जातो.

तो प्लॅस्टिकचा अजिबात नसतो, परंतु त्याविषयी लोक गैरसमज पसरवीत आले आहेत. काही लोकांच्यामध्ये जीवनसत्त्वाची कमतरता आढळते, ती कमतरता भरून काढण्याचे काम हा तांदूळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याशिवाय अंत्योदय, दिव्यांग यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर गोवा हस्तकला, ग्रामीण लघू औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक अरविंद बुगडे यांनी सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

खात्याचे संचालक नेविल अफान्सो यांनी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना, कृषी कार्ड, तसेच केंद्र सरकारने राबविलेल्या कडधान्य वर्षाविषयी माहिती विषद केली.

12 हजार कारागीर!

राज्यात हस्तकला महामंडळाशी जोडलेले 12 हजार कारागिर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान विश्‍वकर्मा योजनेची माहिती त्यांनी दिली. स्वावलंबन योजनेचा फायदा कारागीर कशा पद्धतीने घेऊ शकतात, याचीही त्यांनी विश्‍लेषण केले. या खात्याचे अधिकारी मेल्विन वाझ यांनीही माहिती विषद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT