Goa farming latest update Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: आठवडाभर टाळा खतांचा वापर; कृषी खात्याचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी जारी करणार मार्गदर्शक सूचना

Goa Farmers Fertilizer Advisory: गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. आठवडाभर अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. आठवडाभर अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे पिकाची योग्य काळजी घ्यावी. शक्यतो आठवडाभर खताचा वापरच करू नये, असे आवाहन कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी केले आहे.

ते म्हणाले, कृषी अधिकारी दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असून राज्यातील शेतीच्या सद्यस्थितीचा अहवाल घेत आहोत. गोवा वेधशाळेकडूनदेखील एकूण हवामानस्थितीचा अहवाल मागितला आहे.

कोणती काळजी घ्यावी?

 जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास भात रोपणी काही काळ पुढे ढकलावी.

 ओलावा निर्माण होईपर्यंत रासायनिक खतांचा, विशेषतः युरियाचा वापर टाळावा.

 काजू, नारळ, सुपारी बागा तसेच भाजीपाला पिकांमध्ये सुके गवत, पाने किंवा नारळाच्या काथ्याचे आच्छादन करून मातीतील ओलावा टिकवून ठेवावा.

 तणांमुळे पिकांचे पाणी व अन्नद्रव्यांवर ताण येतो. त्यामुळे नियमित खुरपणी व हलकी कोळपणी करावी.

भाजीपाला व बागायती पिकांसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करावी.

 डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनी चर, लहान तळी आणि तात्पुरते बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न करावा.

 उष्णतेमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे नियमित पाहणी करून निंबोळी अर्कासारख्या जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT