Goa Agriculture College Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: 'उत्पादन वाढीसाठी कृषी संशोधन गरजेचे'- प्रमोद सावंत

Agriculture News: जुने गोवा येथे गोवा कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture News: स्वयंपूर्ण गोव्यासाठी कृषी उत्पादनात वाढ करणे गरजेचे आहे. यासाठी संशोधनाची गरज असून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) समन्वयाने कृषी संशोधन सुरू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांच्या हस्ते काल जुने गोवे येथे कृषी महाविद्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकारच्या कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने जुने गोवे येथे गोवा कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. कृषिमंत्री रवी नाईक, कृषी संचालक नोयल अल्फान्सो, उच्च शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, आमदार राजेश फळदेसाई, कृषी सचिव अरुणकुमार मिश्रा, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, रितेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण भेंडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी स्वयंपूर्ण गोवाही महत्त्वाचा आहे. यासाठी राज्य सरकारकडून स्वयंपूर्ण मित्रांच्या साहाय्याने कृषी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याला आता संशोधनाची जोड आवश्यक आहे. जर एकात्मिक कृषी कार्यक्रमांतर्गत नवे संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचले, तर त्याचा उपयोग उत्पादन वाढीसाठी नक्कीच होईल. कृषी संशोधन संस्थेसाठी लागणारे सर्व सहकार्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल.

पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार

किसान क्रेडिट कार्ड सुविधा, कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणे, याबरोबरच कृषी महाविद्यालयाबरोबर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि किनारपट्टी भागात मत्स्य उत्पादनावर संशोधन करणारी किनारी संस्था विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT