Hanuman Idol Installation Ceremony At Karashirmala In Excitement Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar : वंचितांचे दु:ख दूर करण्यास प्रयत्नशील - रमेश तवडकर

सभापती तवडकर : काराशीरमळयेथे हनुमान मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद : अंत्योदय तत्त्वावर आपण प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. वंचितांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न असून कुणी अशा प्रकारे जीवन कंठत असेल तर निदर्शनास आणून द्यावे. या कामात आपले सहकार्य लाभेल, असे आश्‍वासन सभापती रमेश तवडकर यांनी दिले.

काराशीरमळ-आगोंद येथील नूतन हनुमान मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ६ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर जि. पं. सदस्य शाणू वेळीप, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, ज्येष्ठ गायक कलाकार कमलाकर नाईक, देवस्थान समिती अध्यक्ष गुरू बांदेकर, सचिव सुरेखा बांदेकर, उद्योजक दिपक शर्मा, शरद नाईक गावकर आदी उपस्थित होते. गुरु बांदेकर यांनी प्रस्ताविक केले.

उत्कर्ष बांदेकर, विप्लव बांदेकर, सिद्धार्थ बांदेकर आदी समिती पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

ज्येष्ठांचा सन्मान

समाजाला एकसंघ ठेवण्याची शक्ती मंदिर व्यवस्थेत असून याठिकाणी होणार असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात समाज बांधवांनी हेवेदावे विसरून सहभागी होण्याचे आवाहन जि. पं. सदस्य शाणू वेळीप यानी केले. यावेळी मंदिर बांधकामात योगदान दिलेले उमेश बांदेकर, रामनाथ बांदेकर‌, विश्‍वास बांदेकर यांचा सन्मान केला गेला. शरद नाईक गावकर, प्रशांत नाईक यानी आपले मनोगत व्यक्त केले.

मंदिरातून एकात्मतेचा भाव

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणूसकी, ग्रामव्यवस्था हरवत गेला आहे. मंदिराला जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. देवस्थानात धार्मिक, अध्यात्मिकतेला पोषक असणाऱ्या कार्यक्रमांतून एकात्मतेचा भाव उत्पन्न होत असतो. चांगल्या विचारांचे हे मंदिर केंद्र व्हावे, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT