महादेव विठ्ठल फडते आपल्या जमीनदोस्त झालेल्या घरासोबत  संदीप देसाई
गोवा

Goa: गणेश पूजन कुठे करावे हा यक्षप्रश्न; महादेव फडते यांचे भावनिक साद

घर उभारण्यासाठी मन धजावत नाही, आयुष्यात पहिल्यांदाच एवढे हतबल होण्याची पाळी आपल्यावर आली आहे. हे उदगार आहेत फोंडा तालुक्यातील गांजे येथील ज्येष्ठ नागरिक महादेव विठ्ठल फडते (Senior citizen Mahadev Vitthal Phadte) यांचे घर गोव्यात आलेल्या पूरामुळे जमिनदोस्त झाले आहे.

विठ्ठल पारवाडकर

पणजी: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) जवळ येत आहे. दुसरीकडे घर पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहे . त्यामुळे यंदा गणेश मूर्तीचे पूजन कुठे करावे ? हा यक्षप्रश्न आपल्यासमोर आहे . पूरामुळे घर जमीनदोस्त (Landslides due to floods) झाल्यानंतर सरकारकडून (Government) दोन लाखाची मदत मिळालेले आहे. मात्र नवे घर उभारण्यासाठी मन धजावत नाही.

म्हादयीच्या काठावर घर असल्यामुळे म्हादयीला पुन्हा पुर आला तर ? हा प्रश्न मनात नेहमी सतावत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच एवढे हतबल होण्याची पाळी आपल्यावर आली आहे. हे उदगार आहेत फोंडा तालुक्यातील गांजे येथील ज्येष्ठ नागरिक महादेव विठ्ठल फडते यांचे म्हादयीच्या किनार्‍यावर असलेल्या गांजे गावातील श्री गांजेश्वरी मंडपा जवळील चार घरे पूरामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

यामध्ये महादेव फडते , शांबा पडते, सूर्या गावकर व संदेश नाईक यांच्या घरांचा समावेश आहे. येथील मंडपात निर्विकार चेहऱ्याने बसलेले महादेव फडते यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी आज संवाद साधला. त्यावेळी आपल्या पडलेल्या घराकडे शून्यात पहात महादेव फडते म्हणाले की आयुष्याच्या उतारवयात मोठं संकट आपल्या कुटुंबावर आलं. आपलं घर जमीनदोस्त झालं आणि राहण्याची जागाही निसर्गाने हिरावून घेतली. म्हादयीचा पूर इतका वरपर्यंत येईल असे कधीच वाटले नव्हते. घराच्या

अर्ध्या भागापर्यंत पूर आला आणि घर कोसळून गेले .सामान बाहेर काढणेही शक्य झाले नाही. गणेश पूजनासाठी आता जागा शोधावी लागणार आहे. नपेक्षा जवळच्या श्री गांजेश्वरी मंडपात गणेश पूजन करावे लागणार आहे. आयुष्यात पहिल्यांदाच घराच्याबाहेर

गणेश पूजन करावे लागणार असल्याचे यावेळी महादेव फडते यांनी सांगितले. चतुर्थी नंतर घर बांधण्यास सुरुवात करावीच लागणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT