Goa: सव्वा महिन्यानंतरही पूरग्रस्त भागातील लोक मदतीच्या प्रतिक्षेत

संसार कोलमडलेलेच, यंदा ‘त्यांची’ चतुर्थी उघड्यावर, ज्या नागरिकांची घरे जमीनदोस्त झालीत त्यांच्यासाठी सरकारने एक ते दोन लाख रुपयांचा मदतनिधी (Relief fund) जाहीर केला. काहींना तो मिळालाही. काही जण अजूनही वाट पाहत आहेत.
उघड्यावर पडलेल्या अनेकांच्या मनात आता चतुर्थी कशी साजरी करावी, असा प्रश्न आहे.
उघड्यावर पडलेल्या अनेकांच्या मनात आता चतुर्थी कशी साजरी करावी, असा प्रश्न आहे.Dainik Gomantak

विठ्ठल पारवाडकर / पणजी: दीड महिन्यांपूर्वी पुरामुळे (Due to the flood) घरांबरोबरच संसारही उद्ध्वस्त झाले. काही जण यातून सावरले तर काही जणांची स्थिती अजूनही बिकट (The situation is still dire) आहे. उघड्यावर पडलेल्या अनेकांच्या मनात आता चतुर्थी कशी साजरी करावी, असा प्रश्न आहे. सरकारी पातळीवर मदतीचे प्रयत्न (Efforts to help at the government level) सुरू असले तरी वंचितांची काळजी कुणाला, आमच्याकडे बघणार तरी कोण, अशी व्यथा या पूरग्रस्तांनी ‘गोमन्तक’ कडे (Dainik Gomantak) मांडली आहे. (Goa: People in flood-hit areas still waiting for help)

उघड्यावर पडलेल्या अनेकांच्या मनात आता चतुर्थी कशी साजरी करावी, असा प्रश्न आहे.
Goa: राज्यात पावसाची सेंच्युरी; अतिवृष्टीचा इशारा

२३ जुलै रोजी राज्यात वादळी पावसामुळे अनेक गावांत पूर आला होता. घरे जमीनदोस्त झाली होती. बागायतीची व इतर वस्तूंची हानी झाली. सत्तरीतील अनेक भागातील घरे अद्यापही उभी राहिली नाहीत. सरकारने काहींना एक लाख व काहींना दोन लाखापर्यंत मदत जाहीर केली. बरेचजण या मदतीपासून वंचित आहेत.

‘टीम गोमन्तक’ ने शुक्रवारी (ता.२७) रोजी सत्तरीच्या विविध भागांचा दौरा केला. पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. यापूर्वीही, पूर आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ‘गोमन्तक’ च्या पथकाने पूरग्रस्त भागांचा आढावा घेत समस्यांना वाचा फोडली होती. ज्यांची घरे अद्याप उभी राहिली नाहीत त्यांना ती उभी करण्यासाठी मदत मिळावी, त्यांच्या समस्या सरकार दरबारी पोहचाव्यात यासाठी हा दौरा होता. अडवई, पाडेली, म्हादई, कणकिरे, खडकी, गांजे, पैकुळ, गुळेली या परिसरांतील अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

उघड्यावर पडलेल्या अनेकांच्या मनात आता चतुर्थी कशी साजरी करावी, असा प्रश्न आहे.
Goa: शापोरा नदीला पूर; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

सरकारी प्रक्रिया किचकट; अनेकजण अजूनही मदतीपासून वंचित

ज्या नागरिकांची घरे जमीनदोस्त झालीत त्यांच्यासाठी सरकारने एक ते दोन लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर केला. काहींना तो मिळालाही. काही जण अजूनही वाट पाहत आहेत. सरकारची ही मदतप्रक्रिया किचकट

असल्यामुळे काहींच्या खात्यात निधी जमा झालेला नाही. कणकिरे येथील केसर यशवंत गावडे यांच्याबाबतीत असाच प्रकार घडलाय. तांत्रिक कारणामुळे ते मदतीपासून अद्यापही वंचित आहेत. दुसरीकडे एक ते दोन लाखांमध्ये घर उभारणे शक्य नाही. उर्वरित रक्कम कुठून उभी करायची? हा यक्षप्रश्नही या पूरग्रस्तांसमोर आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी जी प्रक्रिया आहेत ती बरीच किचकट असल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे. किमान गणेश चतुर्थीपूर्वी चेहऱ्यावर हास्य फुलावे, असेही काहींनी म्हटले आहे.

वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ती बांधून देण्यास पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ती बांधून देण्यास पुढाकार घेतल्याचे दिसून आले. Dainik Gomantak

अभ्यास कसा करायचा?

आमचे घर पुरामुळे कोसळले. सगळे साहित्य वाहून गेले. माझी पुस्तके, वह्याही कुठे मिळत नाहीत. शोधून पाहिले, पण मिळाले नाही. कसा अभ्यास करायचा? शाळेत कसे जायचे? आमचे घर परत कधी उभं राहील? असे अनेक प्रश्न सध्या ऋतुजा गावडे या मुलीचे आहेत. कणकिरे येथील ही बालिका तिचे घर कोसळल्याच्या धक्क्यातून अद्याप सावरलेली नाही. सुमारे १२ फूट उंच पुराचे पाणी येथे आले होते.

संसार उभे करण्यास आरोग्यमंत्र्यांचा पुढाकार

कणकिरे येथील पाच दलित बांधवांची घरे कोसळली होती. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ती बांधून देण्यास पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ही घरे अर्धी पूर्ण झाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com