Life Course Immunization Dainik Gomantak
गोवा

Life Course Immunization: हृदयरोग, मधुमेह, कर्करोगग्रस्तांना मिळणार लसीचे कवच! गोव्यात 'लाईफ-कोर्स इम्युनायझेशन 2026-2036'ची अंमलबजावणी सुरू

Goa Adult Vaccination 2026: हृदयरोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसनविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि कर्करोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त प्रौढांची लसीकरणाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हृदयरोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसनविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि कर्करोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त प्रौढांची लसीकरणाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात येणार आहे. नागरिकांना सुदृढ जीवन व्यतीत करता यावे, यासाठी लवकरच लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. अशा प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी लस देणारे आणि त्यासंबंधीचे धोरण अंमलात आणणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

‘लाईफ-कोर्स इम्युनायझेशन २०२६-२०३६’ धोरण अंमलबजावणी उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आरोग्य सचिव यतींद्र मराळकर, संयुक्त सचिव प्रणव भट, गोमेकॉचे डीन जे.पी. तिवारी, आरोग्य संचालक मेधा साळकर, जागतिक आरोग्य संघटना (डब्लुएचओ) प्रतिनिधी डॉ. आकू क्वामी आणि मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, की अशा प्रकारच्या गंभीर आजारांमुळे मृत्यूचा धोका अधिक असतो; परंतु गोव्यातील जनतेला उत्तमोत्तम आरोग्यसेवा मिळावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जे काही करायला हवे ते करण्याचा आमचा प्रयत्न असून नागरिकांनीही या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील ज्या नागरिकांना फिजिओथेरपी किंवा इतर आरोग्य सुविधा द्यायची आहे, किंवा ज्यांना रुग्णालयात येऊन उपचार घेणे शक्य नाही, अशा रुग्णांना त्यांच्या घरी रुग्णवाहिकेद्वारे उपचार पुरविले जाणार आहेत. या सुविधेची अंमलबजावणी प्रक्रिया आरोग्य संचालनालयाने सुरू केली असून प्रत्येक पंचायत स्तरावर टप्प्या-टप्प्याने ही सुविधा राबविण्याचा प्रयत्न असेल. अशा प्रकारची सेवा पुरविणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

गोमेकॉत मोफत केअर टेकर पुरविणार

गोमेकॉतील अनेक रुग्णांकडे बाहेरील केअर टेकर आहेत, जे दिवसाला ५०० ते १ हजार रुपये आकारतात. अनेकांना हे केअर टेकर परवडत नाहीत. हे केअर टेकर गोमेकॉने ओळखपत्र दिलेले असावेत. रुग्णाच्या परिवाराला केअर टेकरसाठी पैसे द्यावे लागू नयेत, अशी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच राज्यातील नागरिकांना कर्करोगाच्या उपचारासाठी परराज्यांत जावे लागू नये, यासाठी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

... अशी असेल लसीकरण मोहीम

१ पात्र प्रौढांना न्यूमोकोकल, इन्फ्लूएंझा आणि हिपॅटायटिस-बी या लसी उपलब्ध करून देण्यात येतील. मधुमेह, फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड किंवा यकृताचे दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, कर्करोगग्रस्त, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले नागरिक तसेच आरोग्यसेवा व इतर आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

२ गोमेकॉ किंवा जिल्हा रुग्णालयांमधील विशेष व असंसर्गजन्य आजारांच्या क्लिनिकद्वारे पात्र रुग्णांची ओळख करून त्यांना लस दिली जाईल.

३ लसींची केंद्रीकृत पद्धतीने खरेदी, कोल्ड-चेन व्यवस्था बळकट करणे, लसीकरणाचे कव्हरेज व पाठपुरावा डिजिटल पद्धतीने नोंदवणे आणि लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांवर देखरेख ठेवण्याची तरतूदही धोरणात आहे.

४ प्रौढांच्या लसीकरणासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने गोमेकॉ आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने धोरण व त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT