Rakhi Naik Prabhudessai
Rakhi Naik Prabhudessai  Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगेतील महिलेच्या मृत्युस प्रशासन जबाबदार; राखी नाईक प्रभुदेसाई यांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे येथे झालेल्या दुर्दैवी कार अपघातात अनिता फर्नांडिसच्या मृत्यूस स्थानिक प्रशासन जबाबदार असून सरकारने तिच्या मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून आर्थिक साहाय्य देण्याची मागणी तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्या राखी नाईक प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

शनिवारी मृत अनिता फर्नांडिस हिच्यावर सांगे दफनभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या जाण्याने श्रद्धांजली आणि हळहळ व्यक्त करून झालेले नुकसान भरपाई होणार नसून या घटनेला स्थानिक प्रशासनाची निष्काळजीपणा कारणीभूत ठरली आहे. 2021 मध्ये वन खात्याने उपजिल्हाधिकारी कार्यालयात गुलमोहर वृक्ष कापून टाकण्यासाठी पत्र व्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले म्हणून सरकारने या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी व त्याच बरोबर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

या संधर्भात तृणमूल पक्षाच्या वतीने राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांना निवेदन देऊन या घटनेची चौकशी करून दुर्दैवी कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासाठी निवेदन सादर करणार आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार सुभाष फळ देसाई यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचें यावेळी स्पष्ट केली.

स्वतंत्र अग्निशमन दल सांगेत हवे

सांगे हा भौगोलिक दृष्टीने सर्वात मोठा भाग असल्याने आपत्कालीन घटना घडतात तेव्हा कुडचडेच्या अग्निशमन दलावर अवलंबून रहावे लागत आहे. पावसाळ्यात तर अशा घटना घडतच असतात त्या वेळी कुडचडेचे अग्निशमन दल इतरत्र गेलेले असतात त्यामुळे सांगेत एखादी दुर्घटना घडल्यास त्या वेळी ताटकळत रहावे लागते म्हणून सांगेचा विचार करताना भौगोलिक दृष्टीने विचार करून मध्यवर्ती ठिकाणी ही सेवा सुरु करण्याची मागणी राखी नाईक यांनी केली.

त्याच बरोबर वन खाते आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयात जीर्ण झाडे तोडण्यासंधर्भात जे खटले चालू आहे ते येत्या पंधरादिवसात निकालात काडण्याची मागणी केली. नैसर्गिक आपत्ती कक्षाला पूर्ण अधिकार असताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका, स्थानिक पांचायतींना पुढाकार घेऊन धोकादायक झाडांची पहाणी कारण्याचा आदेश द्यावा आणि यात कोणी हरकत घेतल्यास होणाऱ्या घटनेस त्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी केली. मयत अनिता फेर्नांडिस हिच्या कुटुंबियांना न्याय मिळे पर्यंत तृणमूल पक्ष सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचें यावेळी राखी नाईक प्रभूदेसाई यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT