Swapnesh Sherlekar Dainik Gomantak
गोवा

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Crime News: रात्रीच्या सुमारास दोन ते तीन फोन आले. काही अर्जंट असेल म्हणून फोन कॉल घेतला तर तिडकून धमकी देण्यात आली, असा आरोप स्वप्नेश शेर्लेकरांनी केला.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देण्यात आली आहे. स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेत्यांने फोन करुन धमकी दिल्याचा आरोप शेर्लेकर यांनी केला असून, याबाबत त्यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

स्वप्नेश शेर्लेकर यांनी याप्रकरणी महानंद अस्नोडकर या व्यक्तीविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महानंद अस्नोडकर भाजपचे नेते असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला राज्यात चांगलाच गाजत असून, पोलिस आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला मिळालेल्या धमकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी याप्रकरणाची दखल घेत भाजपवर निशाणा साधला आहे. "राज्यातील पर्यावरणीय विषयांवर लढा देणाऱ्या स्वप्नेश शेर्लेकरांना धमकी देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे सामाजिक कार्यकर्त्यावरील हल्ला हा गोव्यावरील हल्ला आहे आणि आम्ही शांत राहणार नाही", असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

"रामा काणकोणकर यांच्यानंतर आता स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकी देण्यात आली आहे. राज्याच्या पर्यावरणासाठी लढा देणाऱ्यांना संरक्षण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचे दिसते. विषयाच्या गांभीर्याकडे लक्ष न देता सरकार आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन गुंडगिरीला प्रोत्साहन देत आहे. शेर्लेकरांना सुरक्षा देण्यासाठी तत्काळ पोलिसांनी कारवाई करावी", अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

धमकीच्या फोन बाबत माहिती देताना स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले की, रात्रीच्या सुमारास दोन ते तीन फोन आले. काही अर्जंट असेल म्हणून फोन कॉल घेतला तर तिडकून धमकी देण्यात आली. भाजप विरोधात काही बोलल्यास त्यांच्याकडून इशारा देण्यात आला. आम्ही देशभक्त, तू देशद्रोही अशा पद्धतीने त्या व्यक्तीने धमकी दिल्याचे शेर्लेकर यांनी सांगितले. महानंद अस्नोडकर असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो भाजप नेता असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT