Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Chandel Hasapur Panchayat: चांदेल हसापूरचे सरपंच प्रजय मळीक यांना सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी सरपंचपदाबरोबरच पंच सदस्याचाही राजीनामा पंचायत संचनालयाकडे सादर केला आहे.
Chandel Hasapur
Chandel HasapurDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: चांदेल हसापूरचे सरपंच प्रजय मळीक यांना सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी सरपंचपदाबरोबरच पंच सदस्याचाही राजीनामा पंचायत संचनालयाकडे सादर केला आहे.

सहा महिन्यापूर्वी प्रजय मळीक यांची सरपंचपदी निवड झाली होती. त्यासाठी मोठे राजकारण घडले होते. तुळशीदास गावस यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना खाली खेचण्यात आले होते. त्यानंतर मळीक यांची या पदावर बिनविरोध निवड झाली होती.

Chandel Hasapur
Chandel Hasapur: इकडे अविश्वास ठराव, तिकडे राजीनामा; चांदेल-हसापूरमधील नाट्य, सरपंच तुळशीदास गावस पदमुक्त

एकूण पाच सदस्य असलेल्या या पंचायत मंडळातील एका सदस्याने राजीनामा दिल्याने आता सरपंचपदावर कोणाची वर्णी लागणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवा सरपंचासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

Chandel Hasapur
Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतींची निवडणूक 13 डिसेंबरला? राज्य सरकार करणार घोषणा; प्रभाग फेररचना होणार पूर्ण

मळीक यांनी राजीनामा दिल्याने त्या प्रभागात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आता या प्रभागातून कोण रिंगणात उतरणार याबाबतही उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com