गोवा

PM Modi Congratulates Goa: गोव्याच्या 'हर घर जल'चे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

गोमन्तक डिजिटल टीम

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत गोवा 'शंभर टक्के हर घर जल' प्रमाणित राज्य झाले आहे. यानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे कौतुक करत, सावंत सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराज्य संस्थेचे हे उत्तम उदाहरण आहे. असे नरेंद्र मोदी म्हणाले. ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत नरेंद्र आपले मनोगत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'गोवा देशातील पहिले राज्य बनले आहे ज्याला शंभर टक्के हर घर जल प्रमाणित केले आहे. याशिवाय दादर नगर हवेली आणि दीव दमन हे केंद्र शासित प्रदेश देखील या यादीत समाविष्ट झाले आहेत. गोव्याने हे यश मिळवले आहे, त्यासाठी मी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेचे हे उत्तम उदाहरण आहे.' असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.

'मागील आठ वर्षात जल मीशन वरती अधिक भर देण्यात आला आहे. देशातील दहा कोटी ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळते आहे. मागील केवळ तीन वर्षात सात कोटी कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात सरकारला यश आले आहे.' सरकारच्या हर घर जल मिशनचे हे मोठे यश असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपच्या या दाव्याचे खंडन करत हा दावा साफ खोटा असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला दावा सिद्ध करावा असे आव्हान काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT