Goa Accidents - the road accidents in India 2022 Report  Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: राज्यात 2022 मध्ये 271 अपघाती मृत्यू; पण खड्ड्यांमुळे एकही मृत्यू नाही! केंद्र सरकारचा अहवाल

राज्यातील अपघाती मृत्युंमध्ये सन 2021 च्या तुलनेत 20 टक्के वाढ

Akshay Nirmale

Goa Accidents: गोव्यातील अपघाती मृत्युंमध्ये सन 2021 च्या तुलनेत सन 2022 मध्ये 20 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 2022 मध्ये राज्यात 271 भीषण अपघाती मृत्यू झाले आहेत.

तथापि, रस्त्यातील खड्ड्यांमुळे राज्यात एकही मृत्यू झालेला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. द रोड अॅक्सिडेंट इन इंडिया 2022 असे या अहवालाचे नाव आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे.

दरम्यान, राज्यातील 271 अपघाती मृत्युंमध्ये 28 ज्येष्ठ नागरीक आहे तर एक अल्पवयीन आहे. या अहवालातील आकडेवारीवरून एकूण दर लाख लोकसंख्येमागे 17.3 रस्ते अपघाती मृत्यूचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे.

गोव्यात 2022 मध्ये एकूण 3011 रस्ते अपघात झाले. यापैकी 2801 अपघात दिवसाउजेडी आणि हवामान चांगले असताना घडलेले आहेत. तर 209 अपघात पावसाळ्यात घडलेले आहेत. शिवाय बहुतांश अपघात हे सरळ रस्त्यांवर झालेले आहेत.

यातील 1259 अपघात गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवर घडले आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातात 127 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये हे प्रमाण 81 इतके होते.

तथापि,यातील बहुतांश महामार्ग हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारित नसून ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. या अहवालावरून राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षेबाबत जागरूकतेची गरज असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, यातील बहुतांश अपघात हे अतीवेगामुळे झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील 1259 अपघातांपैकी 1072 अपघात अती वेगामुळे झालेत.

1229 अपघात हे खुल्या भागात झालेले आहेत, जे बाजारपेठेपासून लांब आहेत. 2569 अपघात हे सरळ मार्गांवर झालेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे किंवा रस्ते बांधकामाच्या कामामुळे राज्यात एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. दोन मृत्यू तीव्र उताराच्या ठिकाणी झाले आहेत.

दरम्यान, 1091 जण या अपघातांमध्ये गतवर्षी जखमी झाले होते. यातील 268 जण गंभीर जखमी होते तर 823 किरकोळ जखमी होते.

अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी 179 हे दुचाकीवरून प्रवास करत होते. 51 जण पादचारी होते तर 28 जण चारचाकीतून प्रवास करत होते. यातील तिघे जण ट्रकमध्ये होते तर दोघे जण सायकलस्वार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

SCROLL FOR NEXT