Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मंगेशी येथे भीषण अपघातात युवक ठार; पणजी-फोंडा मार्गावर दुधाच्या टेम्पोची दुचाकीला धडक

भरधाव टेम्पोमुळे वीजेचा खांबही मोडला

Akshay Nirmale

Goa Accident: पणजी-फोंडा मार्गावरील मंगेशी येथे बुधवारी मध्यरात्री टेंपो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात मंगेशीतील दुचाकीस्वार विराज विद्याधर दाभोळकर (वय ३२) याचा मृत्यू झाला आहे. तो वेलिंग - म्हार्दोळ येथे राहत होता.

फोंड्याहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव जीए 05 टी 3421 या क्रमांकाचा दूधवाहू टेंपो जात होता. तर पणजीहून आपल्या घरी वेलिंगला परतणाऱ्या विराज दाभोळकर याच्या जीए 05 व्ही 6016 या क्रमांकाच्या दुचाकीत समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात विराज गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. विराजचे हल्लीच लग्न झाले होते. तो बोटवर कामाला होता. सुटीवर घरी आलेला विराज येत्या 28 तारखेला कामावर रुजू होण्यासाठी बोटवर जाणार होता.

त्याला एक विवाहित भाऊ आहे. मनमिळाऊ स्वभावाचा विराज सर्वांच्या परिचयाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत होती. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

टेम्पोची धडक एवढी जोरात होती की रस्त्याच्या कडेचा विजेचा खांबही मोडून पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'ॲपल सपोर्ट'च्या नावाखाली अमेरिकनांची लूट; बांबोळीतील आलिशान व्हिलावर सायबर पोलिसांचा छापा' 10 जण अटकेत

US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

Small Savings Schemes: गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! PPF, सुकन्या आणि किसान विकास पत्रच्या व्याजदरांवर 30 सप्टेंबरला मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT