IIT Goa Placement: आयआयटी गोवाच्या 105 पैकी 104 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट; वार्षिक 17 लाख रूपये पगार...

99 टक्के विद्यार्थ्यांना मिळाले प्लेसमेंट
IIT Goa Placement:
IIT Goa Placement: Dainik Gomantak
Published on
Updated on

IIT Goa Placement: कोरोना महारोगराई आणि लॉकडाऊननंतरच्या काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट असतानाही IIT गोवाच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळाले आहे. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांनी 100 टक्के प्लेसमेंट मिळवले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवा ही देशातील सर्वात अलीकडील IIT पैकी एक आहे. फार्मगुडी, फोंडा येथे स्थित या संस्थेची स्थापना 2016 मध्ये गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC) येथे तात्पुरत्या कॅम्पसमध्ये करण्यात आली.

पहिल्या तीन वर्षांत IIT Goa ने BTech मध्ये कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी या विषयांमध्ये प्रत्येकी 30 जागा देऊ केल्या होत्या.

IIT गोवा आता BTech मधील कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि मॅथेमेटिक्स अँड कम्प्युटिंग मध्ये 150 जागा देते. याशिाय एमटेक साठी काही जागा आणि डॉक्टरेटसाठीच्या काही जागादेखील संस्था ऑफर करते.

IIT Goa Placement:
Goa-Mumbai Bus Accident: गोवा-मुंबई खासगी बसचा कोल्हापुरात अपघात; एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

संस्थेने बीटेक 2019 ते 2023 शैक्षणिक बॅचच्या IIT प्लेसमेंटमध्ये बॅचने 99 टक्के यश मिळवले आहे.

बॅचमध्ये एकूण 136 विद्यार्थी होते. 105 नोंदणीकृत BTech विद्यार्थ्यांपैकी, 104 जणांना प्लेसमेंट ऑफर मिळाल्या असून त्यांचे सरासरी पॅकेज रु. 17.19 लाख प्रतिवर्ष इतके आहे.

संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये 100 टक्के विद्यार्थी बसले होते. CSE मध्ये, 45 च्या बॅचपैकी 34 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि त्यांना स्थान मिळाले.

त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये 24 बॅचपैकी 24 विद्यार्थ्यांनी नोंदणी करून स्थान मिळवले. BTech MnC मध्ये देखील, 25 विद्यार्थ्यांच्या बॅचमधून नोंदणी केलेल्या सर्व 19 विद्यार्थ्यांना स्थान देण्यात आले.

केवळ मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये प्लेसमेंटमध्ये 100 टक्के यश मिळालेले नाही. यात 34 विद्यार्थ्यांच्या बॅचमधून 28 नोंदणीकृत पैकी 27 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये स्थान मिळवले.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा विद्यार्थ्यांनी एक्सेंचर जपान, विलिंग्ज आणि लिंकस्टाफ सारख्या कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय नोकरीच्या ऑफर मिळवल्या आहेत. एकूण सात आंतरराष्ट्रीय कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या.

IIT Goa Placement:
Baga Restaurant Fire: बागा येथील रेस्टॉरंटला लागली आग; सोफा, लॅपटॉप, एसी जळून खाक

123 कंपन्यांचा सहभाग

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्लेसमेंट प्रक्रियेत एकूण 126 कंपन्यांनी भाग घेतला. या कंपन्यांनी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, उत्पादन व्यवस्थापन, संशोधन आणि विकास, आणि संशोधन अभियांत्रिकी, सल्लागार आणि विश्लेषणात्मक भूमिकांसारख्या विविध डोमेनमध्ये नोकरीच्या संधी देऊ केल्या.

या कंपन्यांकडून ऑफर

पूर्णवेळ नोकऱ्या देणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये Media.Net, Amazon, Trilogy Innovation (Codenation), Paytm, ARM, Siemens, Mathworks, Mentor Graphics, Texas Instruments, AMD, Google, Intuit, Adobe, ICICI Securities, HDFC बँक, जीई एरोस्पेस, वाबटेक कॉर्पोरेशन आणि ओयो रूम्स या कंपन्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com