Bicholim Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: डिचोलीत दोन दुचाकींचा भीषण अपघात; वीज खात्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू....

डिचोली-म्हापसा रस्त्यावर कुंभारवाडा बोर्डे येथे झाला अपघात

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Accident: गोव्यात डिचोली ते म्हापसा या मुख्य रस्त्यावर कुंभारवाडा बोर्डे डिचोली येथे गुरूवारी 19 ऑक्टोबर रोजी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात उसप लाटंबार्से येथील वीज कर्मचारी ठार झाला. श्रीराम गावकर (वय 37) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रात्री 8 च्या सुमारास हा अपघडला होता. जीए 04 के 3146 या दुचाकीवरून पडोसे येथील युवक म्हापसाच्या दिशेने जात होता. तर त्याच्या मागून जीए 04 एम 9863 या दुचाकीवरून श्रीराम गावकर (उसप लाटंबार्से) येत होते.

वेगात असलेल्या गावकर यांच्या दुचाकीची समोरच्या दुचाकीचा जोरात धडक बसली. यामुळे दोन्ही दुचाकींवरील चालकांचा ताबा निसटला आणि दोन्ही दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्या. तथापि, या अपघातात श्रीराम गावकर याचे तोंड आणि डोके रस्त्यावर आपटले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

जमलेल्या स्थानिक लोकांनी 108 रूग्णवाहिकेला संपर्क केला. परंतु डिचोली येथील रूग्णवाहिका अन्यत्र गेली होती. त्यामुळे चोडण येथून रूग्णवाहिका पाठविण्यात आली. ती यायला अर्धा तास लागला. त्यामुळे जखमी श्रीराम गावकर यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी डिचोली पोलीस उपनिरीक्षक विकेश हडफडकर अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

SCROLL FOR NEXT