37th National Games: व्हॉलिबॉलला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धक्का; संघ उतरणार नाहीत...

अस्थायी समितीचा निर्णय ः मानांकनानुसार संघ निवडीसाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण
मिरामार ः गोमंतकीय महिला बीच व्हॉलिबॉलपटू गुरुवारी सराव करताना.
मिरामार ः गोमंतकीय महिला बीच व्हॉलिबॉलपटू गुरुवारी सराव करताना. Dainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games: देशातील व्हॉलिबॉलचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेल्या अस्थायी समितीने गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवडणे शक्य नसल्याचे कारण दिल्यामुळे हा खेळ बाद झाला असून स्पर्धेत नसेल हे स्पष्ट झाले.

देशातील व्हॉलिबॉलचे प्रशासन चालविण्यासाठी, तसेच महासंघाची निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी आयओएने व्हॉलिबॉल अस्थायी समिती नियुक्त केली होती.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटात प्रत्येकी आठ संघ कमी वेळ उपलब्ध असल्याने निवडता येणार नसल्याचे कारण अस्थायी समितीने दिले आहे, तसेच यासंदर्भातील कायदेशीर गुंतागुंतीकडे लक्ष वेधले आहे.

त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलिबॉल खेळ वगळणे योग्य ठरेल, असे मत अस्थायी समितीचे सदस्य एस. गोपिनाथ यांनी व्यक्त केले आहे. ते भारताचे माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटूही आहेत.

आयओए निकषांनुसार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मागील राष्ट्रीय स्पर्धेतील मानांकनानुसार संघ निवडणे आवश्यक आहे, परंतु गेल्या फेब्रुवारीत गुवाहाटी येथे घेतलेली राष्ट्रीय स्पर्धा अनधिकृत भारतीय व्हॉलिबॉल महासंघाची होती. त्यामुळे अस्थायी समितीने राष्ट्रीय स्पर्धा घेणे हा पर्याय ठरतो, परंतु त्यास वेळ खूप कमी आणि इतर अडथळेही आहेत.

मिरामार ः गोमंतकीय महिला बीच व्हॉलिबॉलपटू गुरुवारी सराव करताना.
IND vs BAN: रोहितचा पुण्यात हिट जलवा; केले 'हे' 5 मोठे रेकॉर्ड!

अस्थायी समिती तात्पुरती आहे. राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी खूप काम आवश्यक, तसेच निधीचीही आवश्यकता आहे. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तारखांची घोषणाही झालेली आहे, असे गोपिनाथ यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्राला बुधवारी सांगितले.

मागील काही महिन्या व्हॉलिबॉलची अस्थायी समिती आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ तयारीत मग्न होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात व्हॉलिबॉल अस्थायी समिती आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तांत्रिक आचार समितीत चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अस्थायी समितीला आता व्हॉलिबॉल महासंघाची निवडणूक घ्यावी लागेल.

राष्ट्रीय स्पर्धा तांत्रिक समितीचा सावध पवित्रा

स्पर्धा तांत्रिक आचार समितीचे (जीटीसीसी) अमिताभ शर्मा यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीने घेतलेल्या निर्णयावर विचारले असता,त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र हा निर्णय व्हॉलिबॉल आणि बीच व्हॉलिबॉल या दोन्ही खेळांना बंधनकारक असल्याचे सांगितले.

भारतीय व्हॉलिबॉल महासंघाची निवडणूक अपेक्षित आहे. व्हॉलिबॉलसाठी सध्या अस्थायी समिती आहे. मध्यंतरी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघनिवडीसाठी अस्थायी समिती मग्न राहिली. त्यामुळे मानांकनानुसार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघ निवडणे शक्य झाले नाही. आम्ही सराकात्मक निर्णयाच्या प्रतीक्षेत असून चर्चा सुरू आहे.

त्यामुळे व्हॉलिबॉल संघ सहभागी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, अमिताभ म्हणाले. व्हॉलिबॉल खेळाला स्पर्धेतून बाद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 42 खेळ होतील.

मिरामार ः गोमंतकीय महिला बीच व्हॉलिबॉलपटू गुरुवारी सराव करताना.
Rohit Sharma: हिटमॅनला रस्त्यावरील स्पीड पडला भारी! ट्रॅफिक पोलिसांकडून दंड

हँडबॉलबाबतही संभ्रम

हँडबॉल महासंघाबाबतही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. जीटीसीसी अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी एका महासंघाला स्पर्धा वेळापत्रकाबाबत दिलेले पत्र मागे घेतले आहे.

त्याविषयी विचारले असता, अमिताभ यांनी आपण स्पर्धा वेळापत्रक मागे घेण्याबाबत एका महासंघाला कळविल्याचे मान्य केले, मात्र प्रकरण न्यायालयात वर्ग असल्याने त्यावर जास्त टिप्पणी करणे योग्य होणार नसल्याचे सांगितले. हँडबॉलबाबत योग्य निर्णय होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

खो-खोसाठी इनडोअरचाही पर्याय

फोंडा क्रीडा संकुलात खो-खो स्पर्धा पारंपरिक पद्धतीने खेळली जाणर आहे. मात्र गोव्यात परतीच्या पावसाचे संकेत असल्याने खो-खो स्पर्धेचे वेळापत्रक विस्कळित होऊ नये यासाठी इनडोअर खेळविण्याबाबत पर्याय खुले असल्याचे अमिताभ यांनी नमूद केले.

नेमबाजीसाठी मांद्रे येथील शूटिंग रेंज पूर्ण सज्ज असून नेमबाजी महासंघाचे तांत्रिक अधिकारी एकंदरीत प्रगतीवर खूष असल्याची माहिती अमिताभ यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com