पणजी: गोव्यात अपघाताचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी बांबोळी येथे मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव टँकरने रेंट अ कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की भरधाव टँकर डिव्हायडर फोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारवर आदळला यात कारचे तुकडे - तुकडे झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास बांबोळी येथे हा अपघात झाला. पणजीच्या दिशेने जाणारा टँकर अतिशय वेगात होता यावेळी विरुद्ध बाजुला मडगावच्या दिशेने रेंट अ कार जात होती.
टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर डिव्हायडर फोडून रेंट अ कारवर जाऊन धडकला. यात कारचा चक्काचूर झाला आहे. कारचा चालक आणि आणखी एका व्यक्तीचा यात मृत्यू झाल्याचे समजते.
अपघात एवढा भीषण होता की डिव्हायडर फोडून आलेला टँकर कारवर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पलटी झाला. तर, रेंट अ कारचा यात चक्काचूर झाला आहे. कारचे अक्षरश: तुकडे - तुकडे झाले आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक इतर वाहनांशी स्पर्धा करत होता. यातच त्याने वाहनाचा वेग वाढवला आणि टँकर नियंत्रणाबाहेर गेला.
रेंट अ कारच्या चालकाचे नाव योगेंदर सिंग (५२, रा. दिल्ली) असे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत ठेवण्यात आले आहेत. टँकर चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.