Omkar Elephant: सावधान! ‘ओंकार हत्ती’ गोव्याच्या सीमेवर; वन खाते पुन्हा सतर्क

Goa Elephant News: सिंधुदुर्ग वन विभागाने गोवा सीमेजवळील भागात ‘ओंकार’च्या हालचालींची नोंद घेतली असून, गोवा वन खात्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
Omkar Elephant
Omkar ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ओंकार हत्तीचा वावर इन्सुली (बांदा) परिसरात आढळल्याने राज्याचे वन खाते सतर्क झाले आहे. त्यांनी सीमावर्ती भागात गस्त वाढवली असून ओंकार गोव्यात घुसू नये, यासाठी पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

माहितीनुसार, गोव्याच्या सीमेवर पुन्हा एकदा ‘ओंकार’ चा वावर नोंदवण्यात आला आहे. इन्सुली येथील जुन्या आरटीओ परिसरात तो दिसून आल्याने या परिसरात मोठी उत्सुकता आणि काहीशी चिंता पसरली आहे.

हत्ती बांदा परिसरालगत पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर वन खात्याने तात्काळ यंत्रणा सतर्क केली आहे. सिंधुदुर्ग वन विभागाने गोवा सीमेजवळील भागात ‘ओंकार’च्या हालचालींची नोंद घेतली असून, गोवा वन खात्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. गोवा वन अधिकारी आता सिंधुदुर्ग वन विभागाकडून हत्तीचा ठावठिकाणा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Omkar Elephant
Omkar Elephant: तेरेखोल नदी ओलांडून 'ओंकार हत्ती' वाफोलीत, दोडामार्गच्या दिशेने चालला परत; Watch Video

ड्रोन सर्व्हे आणि गस्त

हत्तीला उचकवू नये किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. ‘ओंकार’च्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ड्रोन सर्व्हे आणि रात्रीच्या गस्तीद्वारे माहिती गोळा केली जात आहे. गोवा आणि सिंधुदुर्ग या दोन्ही वन विभागांच्या समन्वयातून ‘ओंकार’ला सुरक्षित मार्गाने दोडामार्ग परिसरात परत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Omkar Elephant
Omkar Elephant: ‘ओंकार’ने रोखला मुंबई-गोवा महामार्ग, वाहतूक दीड तास ठप्प; दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा, नागरिक भयभीत

एका शेतकऱ्याला अटक

नागरगाळी वनपरिक्षेत्रातील सुळेगाळी येथे रविवारी (ता. २) गणपती गुरव यांच्या शेतातील विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने दोन जंगली हत्तींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी शेतकरी गणपती गुरव यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्तींच्या उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com