Goa Tiger News
Goa Tiger NewsDainik Gomantak

Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Pernem Tiger News: दोन दिवसांपूर्वीच वझरी येथे एक गाय तर कासारवर्णे येथे एका वासराचा वाघाने फडशा पाडला आहे. गुरांचा फडशा पाडणारा वाघ हा पट्टेरी आहे की बिबट्या आहे, हे सांगणे जरी कठीण आहे.
Published on

मोरजी: पेडणे तालुक्यातील वारखंड येथे गुरुवारी ३० ऑक्‍टोबर रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास एक भला मोठा पट्टेरी वाघ रस्ता ओलांडून रानात गेल्याची चर्चा सुरू आहे. त्‍यामुळे तालुक्‍यातील लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन दिवसांपूर्वीच पेडणे तालुक्यातील वझरी येथे एक गाय तर कासारवर्णे येथे एका वासराचा वाघाने फडशा पाडला आहे. गुरांचा फडशा पाडणारा वाघ हा पट्टेरी वाघ आहे की बिबट्या वाघ आहे, हे सांगणे जरी कठीण आहे.

Goa Tiger News
Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

तरी येळवात-वारखंड येथील रस्ता ओलांडून बंद हायस्कूल येथून रानात गेलेला तो पट्टेरी वाघच होता, असा दावा सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांनी केला आहे. त्‍यावेळी त्यांच्यासोबत वाहनावर मोपा येथील एक व्यक्ती होती. या दोघांना पट्टेरी वाघाचे दर्शन घडले, असा दावा त्‍यांनी केला आहे. वन खात्याने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

Goa Tiger News
Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

पेडणे तालुक्‍यात पट्टेरी वाघ असल्‍याचे संकेत कुठेच मिळालेले नाहीत. मात्र बिबटे खूप आहेत. आता जो पट्टेरी वाघ बघितल्‍याचा दावा केला जात आहे, तो कितपत खरा हे सांगणे कठीण आहे. मात्र तो वाघ कोणताही असो, त्‍याला जेरबंद करण्‍यासाठी तातडीने प्रयत्‍न केले जातील.

- हरीश महाले, अधिकारी (वन खाते, पेडणे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com