Bicholim Accident:  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोली बायपासवर ट्रकची व्हॅनला धडक; विचित्र अपघात, 25 मीटर फरकटत नेले

सुदैवाने कुणी गंभीर जखमी नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

Bicholim Accident: डिचोली येथील बायपासवर बुधवारी, 30 ऑगस्ट रोजी दुपारी एक अपघात झाला. एका ट्रकने भाजीची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला (GA 04 2549) धडक दिली.

या धडकेत व्हॅनचे नुकसान झाले आहे. सुमारे 25 मीटरपर्यंत ट्रकने व्हॅनला फरफटत नेले.

दोन्ही गाड्या एकमेकांत अडकून पडल्या आहेत. त्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ट्रकने आधी व्हॅनला धडक दिली. नंतर ट्रक आणि डिव्हायडरच्या मध्ये या ही व्हॅन अडकली होती आणि ती तशीच फरफटत नेली. पुढे जाऊन व्हॅनची दिशा बदलली आणि ती डिव्हायडर शेजारील खांबाला थडकली.

सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघातामुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रकचालकाने ब्रेक का मारला नाही, याचे कोडे या अपघातावेळी कुणालाच उगलडले नाही. त्यावरून सर्वजण ट्रकचालकाला दोष देत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT