Goa Tourism News: 'या' तारखेपर्यंत नोंदणी करा! नाहीतर, वीज-पाणी कनेक्शन तोडणार... गोवा पर्यटन विभागाचा इशारा

हॉटेल्स, गेस्टहाऊसेस, शॅक्स वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सना दिला अल्टीमेटम
Goa Tourism News:
Goa Tourism News: Dainik Gomantak

Goa Tourism Dept Ultimatum to Hotles: गोव्याला आता पुन्हा यंदाच्या पर्यटन हंगामाचे वेध लागले आहेत. 1 ऑक्टोबरपासून पर्यटन हंगामाला सुरवात होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर आता गोवा राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने राज्यातील हॉटेल्स, गेस्टहाऊस, वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर आणि शॅक्स यांना 15 सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.

नूतनीकरण न केल्यास विभाग मोठा दंड आकारेल आणि वीज आणि पाण्याची जोडणीही खंडित करेल, असे पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले.

Goa Tourism News:
धक्कादायक! दोन खूनांनी गोवा हादरला; डिचोलीत नग्नावस्थेत तरूणाचा मृतदेह, माडेलमध्ये कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

पर्यटकांना नोंदणीशिवाय सेवा देणारे बेकायदेशीर असल्याचे विभागाने म्हटले आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट आणि ऑनलाइन सेवा पुरवठादारांनी विभागाकडे नोंदणी न केल्यास त्यांना नोटिसा बजावल्या जाऊ शकतात.

विभागाच्या निदर्शनास आले आहे की हॉटेल, गेस्ट हाऊस, होम स्टे, पर्यटक मार्गदर्शक, जलक्रीडा उपक्रम, खाजगी शॅक, तात्पुरत्या झोपड्या, डीलर्स, ट्रॅव्हल एजन्सी, छायाचित्रकार आणि पर्यटनाशी निगडीत नवीन उपक्रम उदा. मसाले लागवड, ऑनलाइन सेवा प्रदाते, साहसी खेळ इत्यादी सर्वांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी न केल्यास ते बेकायदेशीर ठरवले जाईल. गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायदा, 1982 अंतर्गत नोंदणीकृत किंवा नूतनीकरण केलेले नसल्यास ते सर्व बेकायदेशीर असेल.

काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारने पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत नसलेल्या 301 हॉटेल्सचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यास सुरवात केली होती.

Goa Tourism News:
CM Pramod Sawant: गूड न्यूज! गोव्याच्या ग्रामीण भागात इंटरनेट स्पीड होणार सुसाट; मुख्यमंत्र्यांची माहिती

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी उत्तर गोव्यातील 188 आणि दक्षिण गोव्यताील 113 हॉटेल्सनी वारंवार नोटीस पाठवूनही नोंदणी केली नव्हती, असे सांगितले होते.

दरम्यान, आताही 15 सप्टेंबरपूर्वी नोंदणी, नूतणीकरण न केल्यास दंड आकारला जाईल, असे निर्देशात म्हटले आहे. तसेच वीज आणि पाणी कनेक्शन तोडले जाईल, असेही म्हटले आहे.

पर्यटन विभागाने गेल्या वर्षभरात नोंदणी शुल्कापोटी 82 लाख रुपये जमा केले होते. दरम्यान, व्यवसाय सुलभतेसाठी कागदपत्रांची संख्या कमी केल्याचे विभागाने म्हटले आहे. हॉटेल्स आणि गेस्टहाऊस यांनी नोंदणी करावी."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com