Mormugao Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Mormugao Accident: राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर होत आहे.

Sameer Amunekar

मुरगाव: राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर होत आहे. मुरगाव येथे रविवारी (ता.३० नोव्हेंबर) संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. बेदरकार वेगाने आलेल्या कारने समोरून येणाऱ्या स्कूटरला जोरदार धडक दिली.

अपघातात स्कूटर चालक मल्लिनाथ गौडर (वय ५५) यांना गंभीर दुखापती झाली होती. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. मात्र, जखमांचा तीव्रता इतकी गंभीर होती की उपचार सुरू होण्यापूर्वीच, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. अपघात घडविणाऱ्या कार चालकाची ओळख श्रीकृष्ण बांदेकर (वय २०) अशी झाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कार चालकाविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. पीएसआय सूरज टी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या अपघातामुळे नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत चिंता वाढली असून प्रशासनाने कठोर पावले उचलून वाहतूक शिस्त कडक करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT