

पणजी: शिरोडा मतदारसंघातील कोडारमधील नागरिकांनीही विरोध केल्यानंतर सरकारने नियोजित आयआयटी संकुलासाठी इतर ठिकाणी जागा शोधण्यास सुरुवात केली आहे.
तंत्रशिक्षण खात्याकडून इतर ठिकाणी जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असे खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
राज्यात आयआयटी प्रकल्प उभारण्याचे ठरवून सरकारने काही वर्षांत या प्रकल्पासाठी काणकोण, सांगे, शेळ–मेळावली आदी ठिकाणच्या जागा निश्चित करून जमीन संपादनाची प्रक्रियाही सुरू केली होती.
परंतु, संबंधित भागांतील स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवल्याने सरकारला प्रत्येकवेळी माघार घ्यावी लागली. रिवण–सांगेतून हा प्रकल्प शिरोड्यातील कोडारमध्ये आणण्याचा निर्णय सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता.
पण, तेथील जनतेनेही या प्रकल्पास विरोध दर्शवल्यानंतर सरकारने हा निर्णय थांबवला. त्यानंतर आता तंत्रशिक्षण खात्यामार्फत नव्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. परंतु, प्रकल्पासाठी आवश्यक तितकी जमीन अजून मिळालेली नाही. जागा शोधण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सावईकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.