फोंडा: वेलकास सावई-वेरे येथे कदंब बसने ओम्नी कारला जबरदस्त धडक दिली. यामध्ये कारचालक गुरूदास दत्ता नाईक (सावईवेरे ) गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि.२२ डिसेंबर) रोजी सकाळी हा अपघात झाला. ओम्नी कार चालक केरीहून सवाई-वेऱ्याला येत होता तर बस चालक फोंडयाच्या दिशेने जात होता. वेलकास हा अतिशय वळणांचा रस्ता असल्याने एका वळणावर कदंबा बस चलकाकडून ओम्नी चालकाला जबर धडक बसली.
घटनस्थळावरच एक खोल दरी देखील आणि आहे स्थानिक गेल्या अनेक दिवसांपासून इथे एक भिंत उभारून अपघात रोखण्याची मागणी करत आहेत मात्र अजूनही सरकार याकडे लक्ष देताना दिसत नाहीये. कला व संस्कृती खात्याचे मंत्री तसेच प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी या समस्येकडे लक्ष देत होईल तेवढ्या लवकर या अपघाती वळणावर एखादी सौरक्षक भिंत बांधावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.
या अपघातात गुरुदास दत्ता नाईक (वेरे) हा जबर जखमी झाला असून त्याच्यावर फोंड्यातील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, मिळालेल्या माहितीनुसार गुरुदास नाईक हा फोंड्यातील वीज खात्यात कामाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.