Savoi Verem : शिवरायांचे विचार आत्मसात करा : मंत्री गावडे

Savoi Verem : शिवराज्याभिषेकदिनी वळवईत २५ कलाकारांचा गौरव
Savoi Verem
Savoi Verem Dainik Gomantak

Savoi Verem :

सावईवेरे, शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, ते फक्त युद्ध कौशल्यावर अवलंबून नव्हते, तर त्यासाठी आर्थिक नियोजन देखील महत्त्वाचे होते. शिवचरित्र मुलांनी वाचले पाहिजे. महाराजांचे विचार आत्मसात करणेही गरजेचे आहे, असे मत गावडे यांनी व्यक्त केले.

युग प्रवर्तक व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा वळवईत थाटामाटात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जयघोषात वळवईत शिवमय वातावरण निर्मिती झाली होती.

यानिमित्त सिंहासनारूढ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह प्रियोळ मतदारसंघात भव्य मिरवणूक काढण्यात आली. वळवईच्या श्री गजांतलक्ष्मी संस्थानच्या सभागृहातील रंगमंचावर येथील स्थानिक कलाकारांतर्फे प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दृश्य व प्रसंग याचे उत्तमरीत्या सादरीकरण करण्यात आले.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वळवई गावातील ज्या ज्या कलाकारांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, अशा मरणोत्तर तसेच हयात असलेल्या सुमारे २५ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. हा दिमाखदार सोहळा वळवई येथील श्री शिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे ग्रामपंचायत वळवई व कला आणि संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

व्यासपीठावर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, समाजसेवक समील वळवईकर, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, वेरे - वाघुर्मे सरपंचा शोभा पेरणी, वेलिंग - प्रियोळ सरपंच हर्षा गावडे, तिवरे - वरगाव सरपंच जयेश नाईक, बेतकी - खांडोळा सरपंच विशांत नाईक, श्री गजांतलक्ष्मी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तारी, पत्रकार नरेंद्र तारी, उपसरपंच मिताली शेट, पंच काशिनाथ नाईक, अंजली वेंगुर्लेकर, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर तारी, आयोजन समितीचे अध्यक्ष चारुदत्त फडते उपस्थित होते.

Savoi Verem
Goa Loksabha Election Result: दक्षिण गोव्यात अल्पसंख्याकांची एकजूट ठरली महत्त्वाची; सासष्टीचा गड सर

वळवई भूमीने कला व संस्कृतीची उपासना करून या संस्कृतीचे संवर्धन केलेले असून गोमंतकात क्वचितच काही ठिकाणी कला व संस्कृतीची उपासना झालेली दृष्टीस पडेल. त्यामुळे अशाप्रकारचे कार्यक्रम प्रत्येक गावागावात होणे गरजेचे असून आपल्या संस्कृतीची महती आजच्या मुलांना पटवून द्यायला हवी.

विनायक वेंगुर्लेकर यांनी स्वागत केले. गोविंद गावडे व अन्य मान्यवरांनी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. साईराज कोलवाळकर व साथी यांनी सुंदर पोवाडा सादर केला. ६ जून १९७४ साली वळवई ग्रामपंचायतीतर्फे गावातील लोकांच्या सहकार्याने साजरा केलेल्या ३०० व्या शिव राज्याभिषेक सोहळ्याचे इतिवृत्त सादर करण्यात आले. या इतिवृताचे वाचन डॉ. गोविंद भगत यांनी केले. यानंतर गोविंद गावडे यांच्या हस्ते ज्या कलाकारांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली अशा कलाकारांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. तर अनुश्री वळवईकर यांनी आभार मानले.

नौदलाचे जनक!

समील वळवईकर म्हणाले, आजचा कार्यक्रम हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. महाराजांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर अफाट व अतुलनीय कार्य केले राज्यांना भारतीय नौदलाचेजनक म्हणून ओळखले जाते. कारण तत्कालीन काळात त्यांनी केलेली नौदलाची बांधणी पुढील काळात मार्गदर्शक ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com