Goa crime updates Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: फळांची चोरी ठरली जीवघेणी; फातोर्ड्यातील फळबागेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

Fatorda Incident: शनिवारी सकाळी काही लोक झाडाजवळ गेले असता त्यांना ही धक्कादायक बाब निदर्शनास आली

Akshata Chhatre

फातोर्डा: बोर्डा, फातोर्डा येथे शनिवारी (दि. २९ मार्च) एक हृदयद्रावक घटना घडली. आंब्याच्या झाडावर चढलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी काही लोक झाडाजवळ गेले असता त्यांना ही धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना आणि १०८ रुग्णवाहिकेला माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कामगार असण्याची शक्यता आहे. बोर्डा, फातोर्डा येथील एका घराच्या आवारात ही घटना घडली. ज्या जोडप्याच्या अंगणात हे आंब्याचे झाड आहे, ते अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. सकाळी ते कैऱ्या तोडण्यासाठी बाहेर पडले असता त्यांना ही व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो नेमका कोण होता, कुठून आला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या अंदाजानुसार, ही व्यक्ती रात्रीच्या वेळी आंब्याच्या कैऱ्या चोरण्याच्या उद्देशाने झाडावर चढली असावी. मात्र, दुर्दैवाने त्याचा तोल गेल्याने किंवा अन्य काही कारणाने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वृद्ध जोडप्याने शेजाऱ्यांच्या आणि कामगारांच्या मदतीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT