
South Goa sewage pipeline
सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारत ते आयनॉक्स जंक्शनपर्यंतच्या ८८० मीटर अंतराच्या मलनिस्सारण नॉर्थ ट्रंक मुख्य पाईपलाईनचे ‘क्यूअर्ड इन प्लेस पाईप’ (सीआयपीपी) या तंत्राद्वारे पर्नप्रस्थापनेच्या कामाचा शुभारंभ फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. अंदाजे ६.३३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
यापूर्वी असा प्रयोग या पूर्वी फातोर्ड्यात ३०० मीटर अंतराचे, १.७० कोटी रुपये खर्चून काम करण्यात आले होते, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.
या नवीन तंत्रज्ञानाद्वारे जुन्या पाईप स्वच्छ केल्या जातील. रसायनाचा वापर केला जाईल व जुन्या पाईपमध्ये नवीन पाईप बसविले जातील. त्यामुळे या पाईपमधील सांडपाणी बाहेर शेतात जाणार नाही किंवा शेतातील पाणी या पाईपमध्ये शिरणार नाही, अशी माहिती या वेळी कंत्राटदार फोर्चुन फर्नांडिस यानी दिली.
हे काम ७० वर्षांपर्यंत टिकेल, अशी हमीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. अशा प्रकारचे तंत्रज्ञान केवल युरोपीय देशांमध्ये वापरात आहे व भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, मिझोराम या राज्यांत हाती घेतलेले आहे. गोव्यातील हा दुसरा प्रयोग आहे. पणजी-पाटो इथे सुद्धा हे तंत्रज्ञान वापरले असल्याची माहिती कंत्राटदाराने दिली.
मलनिस्सारणाचे जुने पाईप फुटलेले आहेत व त्यातून पाणी शेत जमीनीत जात आहे. साळ नदी प्रदूषित होण्यामागे हे एक कारण आहे. सरकारने सिवरेज पाईप लाईनची नियमीत देखभाल करणे आवश्यक आहे. फातोर्डा मतदारसंघातील नागरिकांनी मलनिस्सारण जोडणी घ्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या शुभारंभ कार्यक्रमात सिवरेज व साधन सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कुमार खन्ना, इतर अधिकारी व नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी फातोर्डा मतदारसंघातील सिव्हरेजचे १०० टक्के काम पूर्ण होईल. जवळ जवळ ३०० कोटी रुपये खर्चून फातोर्डा मतदारसंघात नॉर्थ ट्रंक सिवरेज पाईपलाईन टाकण्यात आली आहे. हे काम पूर्णत्वाकडे आले असून थोडेसे काम बाकी आहे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती विजय सरदेसाई यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.