मद्यधुंद अवस्थेतच पळ काढणाऱ्या पेशाने वैमानिक (Pilot) असलेल्या या सात पर्यटकांच्या (Tourists) कारला शिवोलीत (Siolim) अपघात (Accident)
मद्यधुंद अवस्थेतच पळ काढणाऱ्या पेशाने वैमानिक (Pilot) असलेल्या या सात पर्यटकांच्या (Tourists) कारला शिवोलीत (Siolim) अपघात (Accident)  Dainik Gomantak
गोवा

Goa: मद्यधुंद वैमानिकांचा शिवोलीत अपघात

दैनिक गोमन्तक

शिवोली: मोरजीत एका क्लबमध्ये शुक्रवारी रात्री संगीत पार्टीवेळी झालेल्या भांडणात इतरांकडून मार खाण्याची वेळ दिल्लीतील (Delhi) सात तरुणांवर आली. मद्यधुंद अवस्थेतच पळ काढणाऱ्या पेशाने वैमानिक (Pilot) असलेल्या या सात पर्यटकांच्या (Tourists) कारला शिवोलीत (Siolim) अपघात (Accident) झाल्याने जवळच्या जंगलात उघड्यावरच रात्र काढण्याची वेळ त्यांच्यावर आली.

या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस तसेच उपनिरीक्षक अमिर तरल आणि पोलीस पथकाने तात्काळ शिवोलीकडे धाव घेत सोनारखेड येथील जंगलाचा परिसर पिंजून काढला आणि शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सातही तरुणांना बेधुंद अवस्थेत असताना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शिवोलीच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. या सातपैकी सहाजण वैमानिक असून त्यांना प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिले. मात्र, एका व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याची अधिकृत कागदपत्रांद्वारे ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी कांदोळीतील एका हॉटेलात उतरलेले दिल्लीस्थित बड्या धेंडांचे सुपुत्र शुक्रवारी रात्री मोरजीतील संगीत पार्टीला गेले होते.

त्यासाठी त्यांनी गोव्यात आल्यानंतर कार भाड्याने घेतली होती. मात्र, पार्टीवेळी त्यांनी केलेली हुल्लडबाजी अंगलट आल्याने पार्टी अर्ध्यावरच सोडून कारने सुसाट वेगाने कांदोळीकडे जाताना कुणीतरी पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या उजव्या बाजूकडील वीज खांबाला जोरदार धडक दिली. पाठलाग करणाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी कार तेथेच सोडून जवळच्या जंगलाकडे धाव घेतली. शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांचा शोध घेत संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढला असता ते सातही जण बेधुंद अवस्थेत जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.

‘निर्भया’च्या बंधूचाही समावेश

शिवोलीत मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या सहा वैमानिकांपैकी एकजण दिल्ली बलात्कार प्रकरणातील ‘निर्भया’चा भाऊ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ज्या जंगलात या तरुणांनी आश्रय घेतला ते अजगर, सापांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT