Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: महाखाजन-धारगळ येथे भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला मागून धडक; एक दाम्‍पत्‍य ठार

couple killed in road accident: धारगळ येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात रामचंद्र चंद्रू राऊत (६३) आणि रेश्मा रामचंद्र राऊत (५७) या साळ येथील दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी/पेडणे: धारगळ येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात रामचंद्र चंद्रू राऊत (६३) आणि रेश्मा रामचंद्र राऊत (५७) या साळ येथील दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू झाला. ट्रक आणि दुचाकी या दोन वाहनांमध्‍ये हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्‍पत्‍य फिजिओथेरपी उपचारांसाठी मधलावाडा-साळ येथून आपल्‍या दुचाकीने (जीए-०४-एम-८१९१) धारगळ येथे आले होते. तेथून ते परत आपल्‍या घरी जात असताना महाखाजन-धारगळ परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर काळाने घाला घातला. मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकची (जीए-०३-व्हीव्ही-८७७३) त्‍यांना जोरदार धडक बसली. हा अपघात सकाळी पावणेअकराच्‍या सुमारास घडला.

याप्रकरणी ट्रकचालक लक्षदीप चलवादी याला पोलिसांनी अटक केली असून पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न उपस्थित केला. पत्रादेवी ते धारगळ या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने ‘ब्लॅक स्पॉट’ची ओळख करून तेथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सूचना फलक उभारावेत तसेच आवश्यक ठिकाणी दुभाजक आणि उड्डाणपूल उभारावेत, अशी मागणी त्यांनी केली.

महाखाजन परिसरातील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुभाजक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक वाहने शॉर्टकट म्हणून अचानक महामार्गावर प्रवेश करतात. दुसरीकडे वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महामार्गावरील वाहतूक विस्‍कळीत

अपघातात ट्रकचा मागील टायर फुटण्याबरोबरच एक्सल तुटून वाहनाचा एक भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दाम्‍पत्‍य होते धार्मिक; गावावर शोककळा

या घटनेमुळे राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले, भाऊ, भावजय, पुतणे आणि परिवार आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभागामुळे राऊत दाम्‍पत्‍य साळ परिसरात परिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. रामचंद्र राऊत हे कदंब परिवहन महामंडळाचे निवृत्त वाहक (कंडक्टर) होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT