Amthane Dam tragedy Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: 'आमठाणे' धरणावरची मजा महागात पडली; 14 वर्षीय युवकाचा 'अपघाती मृत्यू'

Goa Accident News: संध्याकाळी झालेल्या या अपघातात तरुण राणे याने जीव गमावला असून त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला 16 वर्षीय धनवीर गोलतेकर गंभीर जखमी झाला

Akshata Chhatre

बार्देश: सध्या गोव्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महत्वाचं म्हणजे अल्पवयीन मुलं परवानगी नसताना गाड्या चालवतात आणि परिणामी अपघातात घडताना दिसतायत. पीर्ण येथे रविवारी (दि. 23 मार्च) सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक स्वयंअपघातात 14 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी झालेल्या या अपघातात तरुण राणे याने जीव गमावला असून त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला 16 वर्षीय धनवीर गोलतेकर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणे आणि धनवीर यांच्यासह चार तरुणांचा एक गट दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून आमठाणे धरणावर फिरायला गेले होते. धरणावरून परत येत असताना पीर्णजवळ त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान राणेचा मृत्यू झाला, तर धनवीरची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातामुळे अल्पवयीन तरुणांकडून परवान्याशिवाय सुसाट वेगात वाहन चालवण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याची परवानगी नसतानाही ते बेधडकपणे दुचाकी चालवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. या घटनेने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताला नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. अल्पवयीन तरुणांच्या या मृत्यूच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; CWG 2026 मध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं 'गोल्ड मेडल' VIDEO

खरी कुजबूज: बोरकर 'त्या' व्हिडिओवर गप्प का?

Horoscope: शिवकृपेने खुलणार यशाचे दरवाजे! 'या' राशींसाठी सोमवार ठरणार अत्यंत शुभ; सुख, समृद्धी सह प्रत्येक कार्यात मिळणार यश

Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

Goa ST Community Development Fund: एसटींच्या प्रश्नाला उत्तर द्या! 3200 कोटींचा निधी का पोहोचला नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा भाजप सरकारला थेट सवाल

SCROLL FOR NEXT